ठाणे : अमली पदार्थांची तस्करी करणा-या आदित्य चौधरी (२४, किसननगर, भटवाडी, ठाणे) आणि हार्दिक चौधरी (३२, रा. किसननगर, ठाणे) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. त्यांच्याकडून केटामाईन आणि मेथॅकॉलीन हे शरीरावर अपाय करणारे अमली पदार्थ आणि काही रोकड असा ६५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.किसननगर भागात अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी दोघेजण येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पोवार यांना मिळाली होती. त्या आधारे ५ आॅगस्ट रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास किसननगर रोड क्रमांक तीन श्रीरामस्मृती बिल्डिंगजवळ, श्रीनगर, ठाणे याठिकाणी सापळा लावून पोवार यांच्या पथकाने आदित्य आणि हार्दिक या दोघांना ताब्यात घेतले. दोघांपैकी आदित्यच्या अंगझडतीमध्ये सफेद रंगाची क्रिस्टल पावडर असलेला २० हजारांचा दहा ग्रॅम वजनाचा केटामाईन हा अमली पदार्थ, १४ हजारांचा सात ग्रॅम वजनाच्या मेथॉकॉलीन अमली पदार्थाची पावडर, ३०० रुपयांची रोकड, वजनकाटा आणि मोबाइल मिळाला. तर हार्दिकच्या अंगझडतीमध्ये २० हजारांचे केटामाईन अमली पदार्थाची दहा ग्रॅम वजनाची क्रिस्टल पावडर आणि इतर सामग्री असा दोघांकडून ६५ हजार ३०० रुपयांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संतोष धाडवे यांनी श्रीनगर पोलीस ठाण्यात या दोघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ते हा अमली पदार्थ कोणाला विक्री करणार होते? त्यांचे आणखी कोणी साथीदार आहेत का? या सर्व बाबींचा तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या दोघांना ठाण्यातून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2019 10:12 PM
किसननगर भागात अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या आदित्य चौधरी आणि हार्दिक चौधरी या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ६ आॅगस्ट रोजी अटक केली. त्यांच्याकडून केटामाईन आणि मेथॅकॉलीन हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
ठळक मुद्दे६५ हजाराचा ऐवज हस्तगतकिसननगरात केली कारवाईश्रीनगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा