मुंबई : महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (DRI) मोठी कारवाई केली आहे. डीआरआयने देशात तीन ठिकाणी छापेमारी करत मोठ्या प्रमाणात सोने, चांदी आणि रोख रक्कम जप्त केली आहे.
न्यूज एजन्सी एएनआयने डीआरआयच्या हवाल्याने म्हटले आहे की, डीआरआयने अररिया, मुंबई, मथुरा आणि गुरुग्राममध्ये मोठा कारवाई केली. या कारवाईदरम्यान 40 किलो विदेशी सोने, 6 किलो चांदी आणि 5.43 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तसेच 12 जणांना अटक केली आहे.
आरोपींची चौकशी सुरू असून अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे. रोख आणि सोन्याशी संबंधित कागदपत्रांची तपासणी केल्यावर पैसे कुठून आले आणि कुठे जायचे होते, हे उघड होईल. या पैशाचा खरा मालक कोण? या तिन्ही ऑपरेशनची तयारी बऱ्याच दिवसांपासून सुरू होती, असे सांगण्यात येते.
सोन्याची तस्करी आणि ग्रे मार्केटमध्ये विक्री करण्यात एक सिंडिकेट गुंतले असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली.