सुरेंद्र शिराळकर
आष्टा - पेठ सांगली मार्गावर आष्टा पोलीस ठाण्यासमोर बर्निंग टँकरचा थरार अनुभवायला मिळाला. पेट्रोल व डिझेल घेऊन जाणाऱ्या टँकरला सोमवारी दुपारी ४ च्या दरम्यान अचानक आग लागली या आगीत सुमारे दोन ते अडीच लाखाचे नुकसान झाले.
आष्टा पोलीस व घटनास्थळाहून मिळालेल्या माहितीनुसार, हजारवाडी येथून पेट्रोल व डिझेल घेऊन कोल्हापूरकडे जाणारा टँकर क्रमांक एम एच ०९ इ एम ७१७६ आष्टा पोलीस ठाणे नजीक आल्यानंतर अचानक चालकाच्या केबिनमध्ये आग लागली चालकांने तातडीने टँकर थांबवला व गाडीतील डीसीपी फायर सिलेंडर फोडून आग विझविण्याचा प्रयत्न केला. आष्टा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिद ,संजय सनदी, अभिजीत धनगर ,राजेंद्र पाटील ,अवधूत भाट, योगेश जाधव ,नितीन पाटील ,अमोल शिंदे, अभिजीत नायकवडी, समद मुजावर ,रावसाहेब देशिंगे ,संदीप बागडी, परशुराम ऐवळे, आक्काताई नलवडे, काजल जाधव व तसेच आष्टा नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाचे लखन लोंढे ,पोपट माळी ,कुमार शिंदे यांच्यासह हुतात्मा कारखाना व सांगली मिरज कुपवाड महापालिका इस्लामपूर नगरपालिका अग्निशमन कर्मचाऱ्यांनी तातडीने आग विझवली. दरम्यान आष्टा पोलिसांनी परिसरातील तीन डीसीपी फायर सिलेंडरच्या सहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला.
यावेळी पोलिसांनी नजीकच्या हॉटेल दुकानांमधील गॅस सिलेंडर व नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूची वाहने सुरक्षित अंतरावर उभी करण्यात आली या दुर्घटनेत टॅंकरचे केबिन जळून खाक झाले या आगीत सुमारे दोन ते अडीच लाखाचे नुकसान झाले अधिक तपास पोलीस निरीक्षक अजित सिद करीत आहेत. दैव बलवत्तर म्हणून १हजार लिटर पेट्रोल व १ हजार लिटर डिझेल असलेल्या टँकरने पेट घेतला नाही. अन्यथा परिसरातील तीन पेट्रोल पंप, तीन शाळा, पोलीस वसाहत यासह नागरी वस्तीमध्ये व परिसरातील दवाखान्यामध्ये मोठी जीवित व वित्तहानी झाली असती.