मुंबई - कौटुंबिक वादातून मानसिक नैराश्य आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने दादर येथील राहत्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पोलिसाची समजुत काढत त्याला ताब्यात घेतले. म्हणून हा अनर्थ टळला. ३० वर्षीय हा कर्मचारी सशस्त्र पोलिस दलात त कार्यरत आहेत. ते दादर पुर्वकडील शिंदेवाडी परिसरात काही सहकाऱ्यांसोबत राहतात.
गेल्या अनेक दिवसांपासुन हा पोलीस मानसिक तणावाखाली होता. त्याची पत्नी व इतर कुटुंबिय गावी वास्तव्याला असून कौटुंबिक वादामुले ते तणावाखाली होते, अशी माहिती उपायुक्त(एलए) नंदकुमार ठाकूर यांनी दिली. त्यानंतर मानसिक तणावाने या पोलिसाने शनिवारी सकाळी शिंदेवाडी येथील शिवनेरी इमारतीच्या गच्चीवर गेले आणि ते आत्महत्येचा प्रयत्न करु लागले. मात्र हा सर्व प्रकार येथील नागरिकांनी पाहताच, त्यांनी ताबडतोब भोईवाडा पोलिसांना माहिती दिली.
अन्य महत्वाच्या बातम्या...
बोहल्यावर चढलेल्या कट्टर नक्षलवादी महिलेस अटक, दोन्ही हाताने चालवते AK-47
... हा तर टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार, बापाच्या मृत्यूनंतरही मुलाने ८ वर्ष उकळली ९२ लाख पेन्शन
काबुल हादरलं! नमाजावेळी मशिदीत IED स्फोट, इमामासह चौघांचा मृत्यू
थरारक! ४ वर्षांच्या मुलीसह दोन भावंडं २ तास अडकले लिफ्टमध्ये, कासावीस झालेल्यांची दरवाजा कापून केली सुटका
न्यूड व्हिडीओ कॉल करून नर्सला वॉर्डबॉयने केले अशा प्रकारे ब्लॅकमेल
ले साले दारू पी...म्हणत झाले दारुड्या मित्रांमध्ये कडक्याने भांडण अन् हाणला हातोडा
पोलिसांचा असा घेतला बदला; क्वारंटाईन सेंटरच्या पाण्याच्या टाकीत विष मिसळले
त्यानंतर भोईवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच अग्निशमन दल देखील या ठिकाणी पोहचले. याप्रकरणाची माहिती मिळताच तात्काळ पोलीस उपायुक्त सौरभ त्रीपाठी, सहाय्यक पोलीस आयुक्त संगिता पाटील आणि वरिष्ठ पोलिस निरिक्षक विनोद कांबळे घटनास्थळी पोचले आणि त्यांनी या पोलिस कर्मचाऱ्याला समजाविण्याचा प्रयत्न सुरु केला. अखेर तब्बल चार तासानंतर मनधरणी केल्यानंतर अखेर या पोलिसाला ताब्यात घेत त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. या ठिकाणी त्यांच्याकडे चौकशी केली असता कौटंबिक वादातून पाऊल उचल्याचे सांगितले.