बाप लेकीच्या नात्याला काळिमा! सलग तीन वर्ष नराधम बाप मुलीवर करत होता बलात्कार  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 04:35 PM2021-06-23T16:35:06+5:302021-06-23T16:36:23+5:30

Rape case : सोमवारी मुलीचा पुन्हा बापाने लैंगिक छळ करत तिची आई आणि धाकट्या भावाला जर कुणालाही याबाबत वाच्यता केली तर त्याला घराबाहेर काढून टाकण्याची धमकी दिली.

Disgrace to father daughter relationship! For three years in a row, father was raping his daughter | बाप लेकीच्या नात्याला काळिमा! सलग तीन वर्ष नराधम बाप मुलीवर करत होता बलात्कार  

बाप लेकीच्या नात्याला काळिमा! सलग तीन वर्ष नराधम बाप मुलीवर करत होता बलात्कार  

Next
ठळक मुद्देसुमारे तीन वर्षांपूर्वी तिच्या वडिलांनी तिच्यावर बलात्कार केला तेव्हा ती अल्पवयीन होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

भोपाळच्या ऐशबाग भागात सोमवारी ४५ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली.  त्याने त्याच्या १९ वर्षाच्या मुलीवर तीन वर्षांपासून बलात्कार केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली. सुमारे तीन वर्षांपूर्वी तिच्या वडिलांनी तिच्यावर बलात्कार केला तेव्हा ती अल्पवयीन होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सोमवारी मुलीचा पुन्हा बापाने लैंगिक छळ करत तिची आई आणि धाकट्या भावाला जर कुणालाही याबाबत वाच्यता केली तर त्याला घराबाहेर काढून टाकण्याची धमकी दिली. बापाच्या लैंगिक छळाला कंटाळून पीडित मुलीने तिच्या आईशी बोलणे केले आणि नंतर दोघांनी ऐश्वरबाग पोलिस ठाण्यात जाऊन बलात्काराची तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीत घराच्या एका खोलीतील कोणीही नसताना तिच्यावर सुमारे तीन वर्षांपूर्वी तिच्यावर प्रथम बलात्कार करण्यात आला होता. त्यावेळी आरोपीने तिच्या अल्पवयीन भावाला घडलेल्या प्रकाराबद्दल काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली होती असे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीवर पॉक्सो आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

शहरात बलात्काराच्या आणखी एका प्रकरणात, पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने सोमवारी कोलार पोलीस ठाण्यात संपर्क साधला. एका मित्राने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. मार्च २०१९ मध्ये एका मित्राच्या घरी ही घटना घडली. पीडितेनेही आरोपीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप केला. बलात्काराच्या घटनेनंतर तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन देऊन कित्येक प्रसंगी तिच्यासोबत तो राहत होता. 


हे दोघे इंदूरमधील पदव्युत्तर वैद्यकीय कोर्समध्ये वर्गमित्र होते. आरोपी भोपाळमध्ये नोकरीसाठी गेला होता, तर पीडित पदव्युत्तर पदवी घेत होती. आरोपीने पीडित मुलीशी लग्न करण्यास नकार दिल्यानंतर आणि त्याचा पत्ता न सांगता शहर सोडल्यानंतर बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार आहे.
 

Web Title: Disgrace to father daughter relationship! For three years in a row, father was raping his daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.