शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
3
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
4
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
5
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
6
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
7
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
9
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
10
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
11
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
12
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
13
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
14
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
15
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
16
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
17
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
18
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
19
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
20
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी

नात्याला काळीमा! वडिलांसह २८ जणांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आईनं सांगितला कटू अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 3:43 PM

Rape And Domestic Voilence Case : पोलिसांनी महिलेचा पती, मेहुणी आणि सासूसह अनेकांविरोधात भादंविच्या कलम 498 ए, 366, 323, 506, 326, 377 आणि घरगुती हिंसाचार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देउत्तर प्रदेशच्या ललितपूरमधील एका 17 वर्षीय मुलीने तिच्या वडिलांसह समाजवादी पार्टी (सपा) आणि बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) नेत्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

ललितपूर -  गेल्या काही वर्षात, त्याच्या अल्पवयीन मुलीवर अन्य 28 लोकांसह बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. उत्तर प्रदेशच्या ललितपूरमधील एका 17 वर्षीय मुलीने तिच्या वडिलांसह समाजवादी पार्टी (सपा) आणि बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) नेत्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर दोन दिवसांनी तिच्या आईने आता तिच्या पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. बलात्कार पीडितेच्या आईचे अपहरण करून लग्न केलेबलात्कार पीडितेच्या आईच्या म्हणण्यानुसार, पतीने तिच्या मुलीवर बलात्कार केला आणि तिला तिच्या सासरच्या लोकांसह घरगुती हिंसाचाराचा तिला बळी बनवले. महिलेने पती आणि सासरच्या लोकांसह 11 लोकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, वर्ष 2003 मध्ये पतीने तिच्या आई -वडिलांना औषध देऊन घरातून तिचे अपहरण केले होते. त्याने तिचे सोन्याचे दागिनेही घेतले होते. नंतर महिलेला जबलपूरला नेण्यात आले, जिथे तिचे नातेवाईकांच्या उपस्थितीत आर्य समाज मंदिरात जबरदस्तीने लग्न केले गेले.गर्भवती झाल्यानंतर स्त्रीला अन्न दिले गेले नाहीमहिलेने दावा केला की, लग्नाच्या पहिल्या दिवसापासून तिच्या पतीने तिला सतत मारहाण आणि अत्याचार केले. गर्भवती राहिल्यानंतर तिला गर्भपात करण्यास सांगितले गेले. मात्र, जेव्हा तिने नकार दिला तेव्हा तिच्या सासरच्यांनी तिला अन्न देणे बंद केले. शेजारी जेवण देत असत, ज्यामुळे त्याचा जीव कसा तरी वाचला. मुलीला जन्म दिल्यानंतर तिच्यावर पुन्हा अत्याचार करण्यात आले.ही शिक्षा त्या महिलेला पुन्हा गरोदर राहिल्याने देण्यात आलीबलात्कार पीडितेच्या आईने दावा केला की, जेव्हा ती पुन्हा गर्भवती राहिली, तेव्हा तिच्या पतीने तिच्या गुप्तांगाला इजा करण्याचा प्रयत्न केला. तिच्या सासरच्या लोकांनी तिला रॉकेल पिऊन, विष देऊन आणि अॅसिड फेकून तिला मारण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी ती वाचली. महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, तिचा पती आपल्या मुलीला शाळेनंतर अनेक ठिकाणी घेऊन गेला आणि तिला विकण्याचा प्रयत्न केला आणि तिच्यावर बलात्कार केला.तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी महिलेचा पती, मेहुणी आणि सासूसह अनेकांविरोधात भादंविच्या कलम 498 ए, 366, 323, 506, 326, 377 आणि घरगुती हिंसाचार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय, पोलिसांनी एफआयआरच्या विरोधात निवेदन देण्यासाठी आलेल्या 200 बसपा आणि 250 एसपी कार्यकर्त्यांविरोधात दोन एफआयआर देखील दाखल केले आहेत.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसDomestic Violenceघरगुती हिंसा