मधेपुरा - बिहारच्या मधेपुरा जिल्ह्यात एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. याठिकाणी पत्नी माहेरी गेल्यानं नाराज झालेल्या पतीनं जे केले ते ऐकून अनेकांना धक्का बसला. पतीने स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला. यानंतर त्याची अवस्था गंभीर झाली. युवकानं केलेल्या या कृत्यामुळे घरात गोंधळ माजला. त्यात युवकाला हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल करण्यात आले. सध्या या युवकावर उपचार सुरू आहेत.
मधेपुरा येथील रजनी नयानगर परिसरात शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला. येथे एका युवकाची पत्नी माहेरी निघून गेली होती. ती माहेरहून परतली नाही. यामुळे नाराज पती नैराश्येत अडकला होता. त्याने याच निराशेपोटी स्वत:चा प्रायव्हेट पार्ट धारदार शस्त्राने कापला. युवक खोलीत जखमी अवस्थेत पडलेला पाहून कुटुंबातील लोकांनी तातडीने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
पीडित २५ वर्ष युवकाचं लग्न ग्वालपाडा परिसरातील मलोध वार्डातील एका मुलीशी झालं होते. युवकाच्या कुटुंबाने सांगितले की, त्यांना ३ मुली आणि एक मुलगा आहे. युवक पंजाब इथं मंडीत राहून काम करायचा. जवळपास २ महिन्यापूर्वी तो घरी आला होता. तेव्हापासून तो घरीच राहत आहे. मकर संक्रातीसाठी युवकाची पत्नी माहेरी गेली होती. परंतु त्यानंतर ती सासरी परतली नाही. यामुळे युवक नाराज झाला होता असं कुटुंबाने म्हटलं.
पत्नीचा विरह सहन न झाल्याने शुक्रवारी रात्री धारदार शस्त्राने युवकाने स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला. जेव्हा कुटुंबातील इतरांनी ही बाब माहिती पडली तेव्हा तातडीने युवकाला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ज्याठिकाणी डॉक्टर युवकावर उपचार करत आहेत. हा युवक मानसिक तणावाखाली होता. युवकावर सध्या उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मेडिकल कॉलेजचे डॉक्टर सुकेश कुमार यांनी दिली.