सुशांत सिंग राजपूतची माजी असिस्टंट मॅनेजर दिशा सालियान हिच्या मृत्यू प्रकरणात एक धक्कादायक खुलासा मुंबईपोलिसांनी केला आहे. दिशाने मृत्यूपूर्वी १०० या मुंबईपोलिसांच्या मदतकक्षाला फोन केल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, तिने हा कॉल केलाच नव्हता तर त्यावेळी तिने तिच्या लंडनमधल्या एका मैत्रिणीला कॉल केल्याचे तपासात समोर आलं आहे. यामुळे दिशाच्या मृत्यूप्रकरणात वेगळीच माहिती उघडकीस आली आहे.मृत्यूच्या अगदी काही वेळ आधी दिशाच्या फोनवरून १०० हा क्रमांक डायल करून मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात फोन करण्यात आला होता असा दावा केला जात होता. मात्र, दिशाने १०० क्रमांकावर फोन केलाच नव्हता अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांना फोन केल्यानंतर दिशाने सुशांतला फोन केला असा दावा भाजपच्या एका नेत्याने केला होता. दिशाने पोलिसांना आणि सुशांतला फोन करून तिच्यासोबत काहीतरी चुकीचे घडलं आहे आणि जीव धोक्यात आहे असं सांगितलं होतं, अशी चर्चा होती. मात्र, मुंबई पोलिसांनी हा दावा खोडून काढला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी सत्य शोधले असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई पोलीस आणि दिशाच्या आई-वडीलांची यासंबंधी चौकशी केली असता ही एक फक्त कथित गोष्ट आहे असं काहीही घडलं नसल्याचं समोर आलं आहे. तपासानंतर १ जून ते ८ जून या कालावधीत दिशाच्या मोबाइल फोनवरून मुंबई पोलिसांना कोणताही फोन आलेला नाही. त्याचप्रमाणे सुशांतलाही फोन केला नाही. मृत्यूआधी तिने मैत्रीण अंकिता हिला कॉल केला होता. ८ जूनला मालाड येथील ती राहत असलेल्या इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याबाबत अपमृत्यूची मालवणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
शोविकचा मित्र सूर्यदीपचे बॉलिवूड, अंडरवर्ल्ड कनेक्शन असण्याची शक्यता
प्रशांत भूषण यांनी भरला १ रुपयाचा दंड अन् सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका
दिशा सालियान आणि सुशांत राजपूत मृत्यू यामधील रोहन रॉय महत्त्वाचा दुवा; नितेश राणेंचा दावा
सुशांतची आत्महत्या की हत्या?, लवकरच पोस्टमॉर्टेम - व्हिसेरा अहवालातून होणार खुलासा
धक्कादायक! क्वारंटाईन सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग
Breaking : शिक्षकाचा वेतन मिळत नसल्याने आमदार निवास येथे आत्महत्येचा प्रयत्न
सुशांत आणि दिशाच्या मृत्यूचा थेट संबंध, नितेश राणेंनी लिहिले अमित शहांना पत्र
बलात्कारास विरोध केल्याने काकाने चिमुकलीचे केली हत्या, कुजलेल्या मृतदेहावर आढळल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या खुणा
युपी पोलिसांचा आणखी एक कारनामा, जेलमध्ये पाटवण्याची धमकी देऊन घेतली ऑनलाईन लाच