शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी समितीने मुंबई पोलिसांना पाठवली नोटीस, मागितला अहवाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 3:20 PM

Disha Salian Death Case : केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी जून २०२० मध्ये सालियन यांच्या मृत्यूच्या आसपासच्या परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती.

मुंबईबॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या कथित आत्महत्येप्रकरणी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने (MSCW) सोमवारी मुंबईपोलिसांना नोटीस बजावली असून येत्या दोन दिवसात उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी जून २०२० मध्ये सालियन यांच्या मृत्यूच्या आसपासच्या परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती."केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत सालियनवर बलात्कार करून नंतर तिची हत्या केल्याचा आरोप केल्यानंतर, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचे पत्र आम्हाला मिळाले आहे," असे एमएससीडब्ल्यूच्या प्रमुख रुपाली चाकणकर यांनी एका निवेदनात म्हटले आहे.चाकणकर म्हणाल्या की, पेडणेकर यांनी सोमवारी ही तक्रार दाखल केली असून ती मालवणी पोलिस ठाण्यात पाठवण्यात आली आहे, ज्यांच्या हद्दीत ही घटना घडली होती. चाकणकर पुढे म्हणाल्या, "आम्ही त्यांना तिचा शवविच्छेदन अहवाल, एफआयआरची प्रत आणि प्रकरणाशी संबंधित इतर कागदपत्रांसह दोन दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले."मालवणी पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांना महिला आयोगाकडून अद्याप कोणतीही नोटीस मिळालेली नाही. शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणे यांनी सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन यांची हत्या झाल्याचा दावा केला होता.सालियनला मारण्यापूर्वी बलात्कार केल्याचा आरोपही त्यांनी केला. तथापि, मंत्र्यांनी आपल्या दाव्यासोबत कोणताही पुरावा सादर केला नाही. पेडणेकर यांनी राणेंच्या महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या चारित्र्याला कलंकित करत असल्याची टीका केली होती आणि महिला आयोगाने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.34 वर्षीय सुशांत सिंग राजपूत उपनगरातील वांद्रे येथील त्याच्या अपार्टमेंटमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडल्याच्या सहा दिवसांपूर्वी, 28 वर्षीय सालियनने 8 जून 2020 रोजी उपनगरीय मालाडमधील एका उंच इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती.

अजबच! मृत कबुतरांसह महिला पोहोचली पोलीस ठाण्यात, पोलिसांनी केले पोस्टमॉर्टमराजपूत व्यतिरिक्त, सालियनने भारती सिंग, रिया चक्रवर्ती आणि वरुण शर्मा यांसारख्या कलाकारांचे काम देखील सांभाळले होते. गेल्या वर्षी, मुंबई पोलिसांनी सालियनच्या मृत्यूचा तपास बंद केला. कारण या प्रकरणात कोणताही गैरप्रकार झाल्याचा पुरावा समोर आला नाही. पोलिसांनी असेही म्हटले होते की, सालियनच्या मृत्यूला राजपूतच्या मृत्यूशी जोडणाऱ्या अनेक आरोपांना समर्थन देणारा कोणताही पुरावा त्यांना सापडला नाही.

 

टॅग्स :Deathमृत्यूstate women commissionमहाराष्ट्र राज्य महिला आयोगSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतPoliceपोलिसMumbaiमुंबईNarayan Raneनारायण राणे Kishori Pednekarकिशोरी पेडणेकर