जोगेश्वरीतील त्रस्त नागरिकांनी पोलिसांना घातले साकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 01:15 PM2019-07-29T13:15:47+5:302019-07-29T13:17:59+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मुंबई - हत्येच्या प्रयत्नासह फसवणुकीचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपींविरूद्ध ओशिवरा पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही आरोपींच्या कारवायांना आळा बसत नसल्याने त्यांच्याविरूद्ध एमपीडीएअन्वये कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रहिवाशांकडून ओशिवरा पोलिसांकडे करण्यात आली आहे.
जोगेश्वरी (पश्चिम) येथे एस.व्ही. रोडवरील क्रिस्टल सोसायटीतील रहिवाशांनी याबाबत ओशिवरा पोलिसांना निवेदन सादर केले आहे. आसिफ फकीर मोहंमद खान आणि सादीक फकीर मोहंमद खान या भावांविरूद्ध झहीरूद्दीन अब्दुल रशिद काझी या रहिवाशाच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा तसेच मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सादीक फकीर मोहंमद खानविरूद्ध क्रिस्टल सोसायटीच्या अध्यक्षांनी केलेल्या तक्रारीवरून ओशिवरा पोलिसांनी सोसायटीच्या बँक खात्यातील 1 लाख 90 हजार रूपयांचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय अनेक अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत. सोसायटीच्या आवारात अतिक्रमण केल्याप्रकरणीही तक्रार दाखल आहे. प्रतिबंधक कारवाई म्हणून दोन्ही आरोपींविरूद्ध आतापर्यंत चाप्टर केस तसेच न्यायालयात सीआरपीसी 107 अंतर्गत खटला दाखल करण्यात आल्याची माहिती उपनिरीक्षक रामसिंग घाटगे यांनी माहिती अधिकाराअंतर्गत दिली. मात्र तरीही आरोपींकडून कारवाया सुरू असून त्याबाबत तक्रारी दाखल आहेत. त्यामुळे एमपीडीएअन्वये कारवाई करण्यात यावी, असे निवेदन राष्ट्रीय भ्रष्टाचार आणि अपराध निवारक परिषदेचे अध्यक्ष मोहन कृष्णन यांनी मुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्तांना सादर केले आहे.
प्रतिबंधक कारवाई म्हणून दोन्ही आरोपींविरूद्ध आतापर्यंत चाप्टर केस तसेच न्यायालयात सीआरपीसी 107 अंतर्गत खटला दाखल करण्यात आल्याची माहिती उपनिरीक्षक रामसिंग घाटगे यांनी माहिती अधिकाराअंतर्गत दिली.