उल्हासनगर - केंद्र शासित प्रदेश असलेल्या दिव-दमण येथून कार मध्ये आणलेल्या अवैध दारु साठा हिललाईन पोलीसांनी कॅम्प नं-5 येथील भाटिया चौकात जप्त केला. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून कारसह दारु साठा जप्त केला.शहरात दीव-दमन मधून तस्करीच्या मार्गाने आणलेली विविध कंपन्यांची दारु उल्हासनगरात आणुन विकली जाते.अशी माहिती हिललाईन पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी रात्रीच्या वेळी भाटिया चौकात पोलीस दबा देउन बसले होते. यादरम्यान भाटिया चौकात उभी असलेल्या हुंडाई कंपनीची एम एच ४८, ए सी ९२३५ क्रमांक कारची पोलिसांनी झडती घेतली असता, कार मध्ये प्रतिबंधीत परराज्यातील मद्याच्या बाटल्या आढळून आलय. पोलिसांनी लागलीच कार चालक राकेश उर्फ रॉकी चांदवानी याला ताब्यात घेऊन मुद्देमालाचा पंचनामा केला.पोलिसांनी कारसह दारूसाठा जप्त करून कार चालक चांदवानी याला अटक केली. तसेच दोन लाख त्र्याऐंशी हजार सहाशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला,आरोपीस मुंबई दारूबंदी अधिनियम कलम ६५(अ)(इ)१०८ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पोलीस निरिक्षक मोहन खंदारे ह्याच्या मार्गदर्शनात पो.नाईक चंद्रशेखर पाटिल ह्यांचा फिर्यादी वरुन सदर मुद्देमाल जप्त करुन आरोपी अटक करण्यात आला आहे.अधिक तपास पो.हवा. ए.एस.गायकवाड हे करित आहे.
उल्हासनगरात दीव-दमणची दारू जप्त, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 5:27 PM