DNA रिझल्ट निगेटिव्ह आला अन् रेपच्या आरोपात तुरूंगात असलेल्या विद्यार्थ्याला मिळाला जामीन, पोलीस हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 02:43 PM2021-08-30T14:43:16+5:302021-08-30T14:43:40+5:30
आता पोलीस याचा शोध घेत आहेत की, अखेर अल्पवयीन मुलीसोबत रेप कुणी केला होता आणि अल्पवयीन मुलीने या मुलावर रेपचा आरोप का लावला?
केरळच्या मलप्पुरममधून एक घटना समोर आली आहे. इथे अल्पवयीन मुलीच्या रेपच्या आरोपात तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या एका १२व्या वर्गातील मुलाला जामिन मिळाला आहे. मुलाची डीएनए टेस्ट निगेटिव्ह आल्याच्या आधारावर त्याला जामीन देण्यात आला आहे. आणि आता पोलीस याचा शोध घेत आहेत की, अखेर अल्पवयीन मुलीसोबत रेप कुणी केला होता आणि अल्पवयीन मुलीने या मुलावर रेपचा आरोप का लावला?
अल्पवयीन मुलीवर रेपप्रकरणी तुरूंगात कैद असलेल्या एका आरोपीला पॉक्सो कोर्टाने जामीन दिला आहे. मंजेरी पॉक्सो कोर्टात केरळच्या मुलप्पुरम जिल्ह्यातील तिरूरंगाडीच्या १२ व्या वर्ता शिकत असलेल्या विद्यार्थ्याला जामीन दिला. १८ वर्षीय विद्यार्थी ३५ दिवसांपासून तुरूंगात होता. (हे पण वाचा : आईला कानोकान खबर न लागू देता तरूणीने डझनभर पुरूषांसोबत केलं लग्न, असा झाला भांडाफोड)
१७ वर्षीय गर्भवती मुलीच्या जबाबाच्या आधारावर विद्यार्थ्याला २२ जून रोजी पॉक्सो अॅक्टनुसार अटक करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने शाळेतून स्पेशल क्लास पूर्ण करून घरी येत असलेल्या अल्पवयीन मुलीवर कथितपणे रेप केला. विद्यार्थ्यावर पॉक्सो अॅक्टनुसार अनेक कलमा लावण्यात आल्या.
विद्यार्थ्याच्या विनंतीवरून डीएनए टेस्ट करण्यात आली. विद्यार्थ्याने पोलिसांना सांगितलं होतं की, तो निर्दोष आहे. डीएनए टेस्ट निगेटिव्ह आल्यावर विद्यार्थ्याला शनिवारी तुरूंगातून सोडण्यात आलं. सत्य समोर आल्याने विद्यार्थ्याचा परिवार आनंदी आहे आणि त्यांना आशा आहे की, लवकरच खरा गुन्हेगार पकडला जाईल. पोलिसांनी सांगितलं की, या प्रकरणी दुसरा कुणी आरोपी नाही. त्यामुळे जबाबात काही गडबड आहे की नाही याचा तपास पोलिसांची टीम घेत आहे.