मुंबई - महात्मा गांधी यांच्या १५० जयंतीनिमित्त मुंबई पोलिसांनी ऑफिशियल ट्विटर अकाउंटवर सोशल मीडिया अथवा इंटरनेटच्या माध्यमातून होणाऱ्या वाईट गोष्टीचा प्रसार रोखण्यासाठी एक अनोखी पोस्ट टाकली आहे. या पोस्टद्वारे पोलिसांनी बुरा मत टाईप करो, बुरा मत लाईक करो, बुरा मत शेअर करो असा संदेश देत गांधी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यातून नक्कीच अनेकांपर्यंत चांगला संदेश पोहचविण्यासाठी गांधी जयंतीचे औचित्य साधून मुंबई पोलिसांनी प्रयत्न केला आहे.
मुंबई पोलीस अनेकदा वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत, अमली पदार्थ सेवनाविरोधात, किकी चॅलेंजविरोधी तसेच अन्य समाजविघातक घटनांना आळा घालण्याच्या हेतूने ट्विटरच्या माध्यमातून कधी नागरिकांना आवाहन करतात तर कधी बोध घेण्यासारखे संदेश देत असतात.