शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
4
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
5
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
6
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
7
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
8
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
9
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
11
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
12
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
13
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसं मिळवायचं, जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं
14
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
15
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
16
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
18
अरेरे! १.२५ लाख पगार, नवरदेवाने दाखवली सॅलरी स्लीप पण ऐनवेळी नवरीने दिला नकार, कारण...
19
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
20
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!

घरमालकांनो सावधान! ओळखपत्रांशिवाय खोल्या भाड्याने देऊ नका, खोट्या गुन्ह्यात अडकाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2019 11:41 PM

वाढत्या गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी पोलिसांनी भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्यात देणे सक्तीचे व बंधनकारक केले आहे.

चाकण - वाढत्या गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी पोलिसांनी भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्यात देणे सक्तीचे व बंधनकारक केले आहे. मात्र, अशी माहिती देताना आपण खोट्या गुन्ह्यात अडकण्याची शक्यता असल्याने खोल्या भाड्याने देताना सावधानता बाळगण्याची वेळ चाकण पंचक्रोशीतील घरमालकांवर आली आहे.नवरा-बायको नसतानाही ओळखीची कागदपत्रे मागितल्याने काल खराबवाडी (ता. खेड) येथे एका तरुणीने आपण अविवाहित असल्याचे बिंग फुटल्याने एका घरमालकाला विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यात अडकविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शेवटी पोलिसी खाक्या दाखवताच संबंधित तरुणीने प्रतिज्ञापत्र सादर करून खोटी फिर्याद दिल्याचे कबुल केले आहे.या घटनेमुळे घरमालकाला नाहक बदनामीला सामोरे जाऊन मनस्ताप सहन करावा लागला आहे. त्यामुळे घरमालकांनी ओळखपत्राशिवाय खोल्या भाड्याने देऊ नये, असा इशारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, यापूर्वी चाकण परिसरात दहशतवादी असल्याचे निदर्शनास आले होते. तसेच औद्योगिकरणामुळे वाढती लोकसंख्या ही सर्वांची डोकेदुखी ठरत आहे. चाकण परिसरात स्थानिक भूमिपुत्रांचा खोल्या बांधून भाड्याने देणे हा व्यवसाय बनला आहे.वाढत्या गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी पोलिसांनी भाडेकरूंची माहिती सादर करणे घरमालकांना बंधनकारक केले आहे. तसेच भाडेकरूंची माहिती सादर न केल्यास घरमालकांवर गुन्हे दाखल केले जातात, त्यामुळे घरमालकांची चिंता वाढली आहे.खराबवाडी (ता. खेड) येथील कड आळीत असणाऱ्या एका खोलीत अहमदनगर जिल्ह्यातील २० वर्षीय तरुणी २५ जानेवारीपासून आपल्या मित्रासोबत आपण पती-पत्नी असल्याचे सांगून भाड्याने राहत होती. वारंवार ओळखपत्र मागूनही ते द्यायचे टाळत होते.परंतु दोघांकडेही ओळखपत्र नव्हते.बिंग फुटल्याने तरुणीने घेतला बदलासुपरवायझर कृष्णा रामराव चांदणे हे संबंधित तरुणीच्या खोलीजवळ जाऊन तुमचे व तुमच्या नवºयाचे फोटो, आधारकार्ड व पॅनकार्ड त्वरित द्या, सदर माहिती चाकण पोलिसांना विहीत नमुन्यात भरून द्यायची आहे, असे सांगितले. त्या वेळी संबंधित तरुणीने हा माझा नवरा नसून माझा मित्र (बॉयफ्रेंड) असल्याचे सांगितले असता चांदणे यांनी ही बाब घरमालक कड यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे घरमालक कड हे चांदणे सोबत तिथे जाऊन त्या तरुणीला खोली रिकामी करायला सांगितले.आपण नवरा-बायको नसल्याचे बिंग फुटल्याने सदर तरुणीने चाकण पोलीस ठाण्यात घरमालकाविरुद्ध विनयभंगाची खोटी फिर्याद दिली. मात्र, महिला पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांनी पोलिसी खाक्या दाखवताच ती तरुणी पोपटासारखे बोलू लागली व आपण खोटी फिर्याद दिल्याचे कबूल केले. त्यानंतर त्या तरुणीकडून रितसर प्रतिज्ञापत्र करून ‘त्या’ घरमालकाची अखेर सुटका झाली.

टॅग्स :HomeघरCrime Newsगुन्हेगारीPuneपुणे