मुंबई - मेघवाडी पोलिसांनी ५८ वर्षीय डॉक्टरला एका महिला रुग्णावर बलात्कार आणि फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. बलात्कार आणि फसवणुकीशिवाय या डॉक्टरवर २७ वर्षीय पीडित महिलेचा आक्षेपार्ह व्हिडिओ वायरल केल्याचा देखील त्याच्यावर आरोप आहे. अटक डॉक्टरचं नाव वंशराज द्विवेदी असं आहे. मेघवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा झाल्यानंतर पोलिसांनी पुढील तपास देखील सुरु केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण २०१५ मधील आहे. ज्यावेळी पीडित महिला रुग्ण ही डॉक्टर वंशराज द्विवेदीकडे आपल्या मुळव्याधीच्या आजारावरील उपचारांसाठी डॉक्टरांकडे गेली होती. डॉक्टरने दुसऱ्या भेटीदरम्यान महिला रुग्णाला गुंगीचं इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं. दरम्यान, महिलेला बेशुद्ध केल्यानंतर डॉक्टरने तिचा आक्षेपार्ह व्हिडिओ शूट केला. नंतर डॉक्टर हा व्हिडिओ वायरल करण्याची धमकी देत तिला सतत ब्लॅकमेल करत महिलेचं शारीरिक शोषण करत होता. या डॉक्टरने महिलेला जवळजवळ ३ ते ४ वर्ष ब्लॅकमेल केलं. मागील वर्षापर्यंत तो तिला सतत ब्लॅकमेल करत होता. मात्र, काही महिन्यांपूर्वीच पीडितेचं लग्न झालं. त्यानंतर तिने डॉक्टरचा फोन उचलणं बंद केलं होतं. त्यानंतर त्याने तिचा व्हिडिओ वायरलके केला.एकदा महिलेच्या पतीकडे शोधलं मीडियाद्वारे हा व्हिडिओ पोहचला. त्यानंतर पतीने पत्नीकडून या संपूर्ण प्रकरणाची हकिकत ऐकून घेतली. त्यानंतर पीडित महिला आणि तिच्या पतीने आरोपी डॉक्टरविरोधात मेघवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल केला. याप्रकरणी कारवाई करताना पोलिसांनी आरोपी डॉक्टरला अटक केली. कोर्टात त्याला हजर केले असता कोर्टाने याप्रकरणी त्याला १७ ऑक्टोबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.
रुग्णाचा बलात्कारप्रकरणी डॉक्टरला अटक; आक्षेपार्ह व्हिडीओ केला वायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 6:25 PM
१७ ऑक्टोबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ठळक मुद्देअटक डॉक्टरचं नाव वंशराज द्विवेदी असं आहे. डॉक्टरवर २७ वर्षीय पीडित महिलेचा आक्षेपार्ह व्हिडिओ वायरल केल्याचा देखील त्याच्यावर आरोप आहे. डॉक्टरला एका महिला रुग्णावर बलात्कार आणि फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.