दत्ता यादव
सातारा: रुग्णसेवा करता करता डॉक्टर कधी हनीट्रॅपच्या जाळ्यात रमले, हे त्यांनाच कळले नाही. पद, पैसा, प्रतिष्ठा हे क्षणभर विसरून डॉक्टरांनी आपली उरलीसुरली इज्जत व्हिडीओ कॉलिंगद्वारे पणाला लावली अन् डॉक्टरांचा इथेच घात झाला. महिलांच्या टोळीने सावज हेरला अन् सुरु झाली साताऱ्यात थरारक खंडणीची कहाणी.
साताऱ्यातील एका ४६ वर्षीय डॉक्टरचे भले मोठे हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये काही महिन्यापूर्वी एक महिला रुग्ण म्हणून त्या डॉक्टरांकडे गेली होती. त्यावेळी संबंधित महिलेने डॉक्टरांचा मोबाईल नंबर घेतला. डॉक्टरांनीही प्रामाणिकपणे आपला मोबाईल नंबर त्या महिलेजवळ दिला. भल्यामोठ्या हॉस्पिटलमध्ये लाखो रुपये कमावणारा आपल्याला सावज सापडला, या अविर्भावात महिला घरी गेली. त्यानंतर मात्र डॉक्टरांना रोज मेसेज येऊ लागले. डॉक्टरांनी सुरुवातीला त्या मेसेजकडे दुर्लक्ष केले. मात्र काही दिवसानंतर डॉक्टरांनाही मोह आवरता आला नाही. त्यांनीही संबंधित महिलेसोबत चॅटिंग सुरू केले. हे चॅटिंग त्यांचे व्हिडिओ कॉलिंगपर्यंत पोचले. हळूहळू हे चॅटिंग इतके शिगेला पोचले की, संबंधित डॉक्टर आपले भान हरपून बसले आणि कधी हनीट्रॅप च्या जाळ्यात अडकले, हे त्यांनाही कळले नाही. आता खरी सुरुवात त्यांची इथून पुढे झाली. संबंधित महिला व्हिडीओ कॉलिंग करून स्वतः विवस्त्र होऊ लागली. त्यानंतर डॉक्टरांनाही गळ घातली जाऊ लागली. डॉक्टरांचीही उत्कंठा स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे त्यांनीही संबंधित महिला सांगेल त्या पद्धतीने म्हणे कृत्य केलं. पण हे कृत्य आपल्याला महागात पडेल, याची जराही त्यांना भनग लागली नाही. असे प्रकार वारंवार होऊ लागल्यानंतर संबंधित महिलेने आपल्याजवळ पुरावे साठवून ठेवले. या पुराव्यांच्या आधारेच आता आपण डॉक्टरांना ब्लॅकमेल करू आणि भक्कम पैसा कमवू अशी स्वप्न पाहून संबंधित दोन महिलांनी डॉक्टरांकडे तब्बल ६० लाखांची मागणी केली. पैसे दिले नाहीत तर हॉस्पिटल वर मोर्चा अनु आणि पोलिस ठाण्यात तक्रार करू अशीही त्यांना धमकी देण्यात आली. हे ऐकून खरं तर डॉक्टरांच्या पायाखालची जमीन सरकली. काय करावे हे क्षणभर त्यांना सूचनासे झाले.
थोडेफार पैसे देऊन आपण हे प्रकरण मिटवून नेऊ असे म्हणून त्यांनी तब्बल १२ लाख संबंधित महिलांना रोख स्वरूपात दिले. या पैशांमधून संबंधित दोन महिलांनी केवळ ११ लाख ९५ हजारांचे दागिने खरेदी केले. हे पैसे आपापसात महिलांनी वाटून घेतले. पैसे संपल्यानंतर आता उरलेल्या पैशासाठी पुन्हा डॉक्टरांकडे मागणी होऊ लागली. आपण किती पैसे दिले तरी या महिलांची पैशाची भूक काही संपणार नाही, अशी अखेर संबंधित डॉक्टरला जाणीव झाली. आपल्याबाबत असा प्रकार घडला आहे आणखी इतर कोणा बाबतीत घडू नये, असे त्यांना वाटल्यानंतर त्यांनी धाडस करून शाहूपुरी पोलीस ठाणे गाठले. झालेला प्रकार पोलिसांसमोर त्यांनी कथन केला. त्यांच्या वयाचा विचार करता पोलिसांनी त्यांना विश्वासात घेऊन त्यांना धीर दिला. त्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी थंड डोक्याने विचार करून हनीट्रॅपमध्ये गुंतलेल्या महिलांना अडकवण्यासाठी सापळा लावला. त्या महिलांसाठी पैसा हाच सर्वस्व असल्याने त्या महिला फोन करताच पैसे नेण्यासाठी अगदी धावतच आल्या आणि पोलिसांनी लावलेल्या सापळ्यात अगदी अलगद अडकल्या. अशाप्रकारे साताऱ्यातील सर्वात मोठ्या हनीट्रॅप प्रकरणाची पोलिसांनी पाळेमुळे उखडून काढली.
अन्य महत्वाच्या बातम्या...
पूनम पांडे विनयभंग प्रकरण : सॅम बॉम्बे सध्या झिजवतोय पोलीस ठाण्याचे उंबरठे
Sushant Singh Rajput Case : आता तर अभिनेत्रींची नावं समोर आलीत; अभिनेते अजून बाकी आहेत! ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया
एनसीबी कार्यालयासमोर न्यूज चॅनल्सचे रिपोर्टर्स भिडले, पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप
बॉलिवूडमधल्या ड्रग्ज कनेक्शनची पाळंमुळं खणून काढतोय डॅशिंग मराठी अधिकारी... चला भेटूया!
धारदार शस्त्राने हल्ला करून एका तरुणाची अज्ञाताने केली हत्या
विदेशी फेसबुक फ्रेंडने फसविले, गिफ्ट पाठविण्याची केली बतावणी
दीपिका - करिष्माची समोरासमोर झाडाझडती, सारा, श्रद्धा देखील एनसीबी चौकशीसाठी पोहचल्या
दीपिकाची तीन-चार राउंडमध्ये होणार चौकशी, एनसीबीने जप्त केला फोन
NCB ने कारवाईचा फास आवळला, धर्मा प्रॉडक्शनच्या माजी निर्माता क्षितिज प्रसादला अटक