भाईंदर - भाईंदरच्या उत्तन येथील डॉक्टर मुलाच्या रुग्णालयातील ५० हजार रुपयांची रोकड आई आणि भावाने चोरुन नेल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.सुरज सभापती यादव (३०) हे डॉक्टर असून उत्तनच्या बाप्टीस्टा इमारतीत फोनसेकर यांच्या तीसऱ्या मजल्यावरील सदनिकेत भाड्याने एकटे राहतात. त्यांचे ठाण्याच्या गावदेवी मंदिराजवळील रोज एडल इमारतीत विघ्नहर क्रिटीकल केअर नावाने रुग्णालय आहे. सुरजची आई उर्मिला (५०) व मोठा भाऊ सचीन (३२) रा. राणावत हाईट्स, रामदेव पार्क, मीरारोड येथे राहतात.१० तारखेला रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा पगार केला जात असल्याने, सुरज यांनी बुधवारीच ५० हजार रुपये रुग्णालयातील दालनातल्या खणात ठेवले होते. दरम्यान, त्यावेळी दालनात आलेली आई मालमत्तेवरुन त्यांच्याशी भांडत होती. त्याकडे लक्ष न देता सुरज रुग्णाला पाहण्यासाठी निघून गेले. त्यांचा भाऊ सचीनसुध्दा दालनात आला. ते दोघे बसले असताना कर्मचारी येत जात होते. सायंकाळच्या सुमारास सुरजने खण पाहिला असता, त्यातून ५० हजार चोरीला गेले. याप्रकरणी गुरूवारी उत्तन सागरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनंतर सुरजची आई उर्मिला, भाऊ सचीन व अनोळखी व्यक्तीविरोधात ५० हजार रुपये चोरी केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा ठाणे पोलिसांकडे वर्ग केला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.नेहमीच करतात शिवीगाळतक्रारदार डॉक्टरची आई आणि भाऊ काही कामधंदा करत नाहीत. त्यांचा सर्व खर्च सुरज करतात. पण मालमत्तेच्या वादातून रुग्णालयात जाऊन तोडफोड, शिवीगाळ करणे आदी प्रकार आई व भावाने केले असले, तरी सुरज यांनी त्याबाबत तक्रार केली नव्हती.
डॉक्टर मुलाकडे आईसह भावाने केली चोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 1:21 AM