लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने डॉक्टरची १ कोटी ३१ लाखाची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींवर सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुंतवणुकीच्या माध्यमातून अधिक नफा कमावण्याचा मेसेज त्यांना आला होता. त्यामधील लिंकला त्यांनी प्रतिसाद दिला असता त्यांना क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करून नफा मिळवण्याचे सांगण्यात आले. शिवाय ग्रुपमध्ये ॲड करून त्यांना कामाचे प्रशिक्षणदेखील दिले. त्यानंतर मयूर यांनी विश्वास ठेवून १ लाख ३१ हजार डॉलर भरले होते. यानंतर त्यांना सतत तोटा होत असल्याचे सांगण्यात आले. तसेच त्यांना रक्कम गुंतवल्यास नफा मिळेल, अशी खात्रीदेखील दिली. आपली फसवणूक होत असल्याचे त्यांच्या लक्षात येताच सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे.