यवतमाळ : उमरखेड येथील वैद्यकीय अधिकाऱ्यावर अज्ञात इसमांनी भर रस्त्यावरच गोळ्या झाडल्या. डाॅ. हनुमंत धर्मकारे हे या गोळीबारात गंभीर जखमी झाले आहे. ही घटना मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास उमरखेड-पुसद मार्गावर साकळे विद्यालयापुढे घडली.
डाॅ. धर्मकारे हे उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्यावर गोळीबार करणारे नेमके कोण व हा हल्ला करण्यामागे नेमके कारण काय, हे अद्याप स्पष्ट होवू शकले नाही. जखमी डाॅक्टरवर उपचार सुरू आहेत.