कुत्रा हा जगातला सर्वात प्रामाणिक प्राणी म्हणून प्रसिद्ध आहे. इतकंच नाही तर हे वेळोवेळी सिद्ध झालं आहे. आपल्या मालकावर ते किती प्रेम करतात याच्या अनेक घटना नेहमीच समोर येतात. तसेच आपल्या मालकांना ते संकटातूनही वाचवतात. अशीच एक घटना मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) ग्वाल्हेरमधून (Gwalior) समोर आली आहे. इथे एका कुत्र्याने त्याच्या मालकाला किडनॅप होण्यापासून (Dog Saved Owner Life) वाचवलं. मालकाला जेव्हा काही लोक मारहाण करत व्हॅनमध्ये टाकत होते तेव्हा कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला आणि किडनॅपर्सना जीव मुठीत घेऊन त्यांना पळ काढावा लागला.
कुत्र्याने वाचवला मालकाचा जीव
ग्वाल्हेरच्या अशोक कॉलनीतील ही घटना आहे. याप्रकरणी अॅडिशनल एसपी राजेश दंडोतिया यांनी सांगितलं की, अशोक कॉलनीमध्ये राहणारे नितीन जेव्हा आपल्या घरी एकटा होता. त्यावेळी व्हॅनमधून चार लोक त्याच्या घरी आणि त्यांनी नितीनला मारहाण सुरू केली. त्यानंतर हे लोक नितीनला व्हॅनमध्ये जबरदस्ती बसवत होते. तेव्हा त्यांच्या पाळीव कुत्र्याने हे सगळं पाहिलं आणि त्याने त्या किडनॅपर्सवर जोरदार हल्ला केला.
जर्मन शेफर्ड ब्रीडच्या कुत्र्याने किडनॅपर्सवर हल्ला केला आणि एक एक करून त्यांना धडा शिकवला. कुत्रा इतका आक्रामक झाला होता की, किडनॅपर्सना घाम फुटला आणि मग ते नितीनला तिथेच सोडून जीव मुठीत घेऊन पळून गेले. कुत्र्याची ही बहादुरी तेथील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली.
नितीनच्या तक्रारीवरून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतली आहे. पोलीस म्हणाले की, लवकरच सर्व आरोपींना अटक केली जाईल.