शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंमुळे अदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
3
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा', 'जिलेबी सेलिब्रेशन' अन् महायुतीच्या नेतेमंडळींचा तुफान जल्लोष
5
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
8
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
9
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
10
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
12
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
13
Dindoshi Assembly Election: संजय निरुपम पराभूत; निकराच्या लढतीत सुनील प्रभू विजयी
14
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
15
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
17
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
19
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
20
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?

डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण : पीडितेच्या अब्रूची किंमत लावली होती ५०० रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 8:44 AM

पैसे कमाविण्याचे साधन म्हणून वापर

ठळक मुद्देपैसे कमाविण्याचे साधन म्हणून वापर

डोंबिवली : डोंबिवलीत १५ वर्षीय पीडित मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीने संबंधांचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिला मित्रांच्या तर स्वाधीन केलेच, शिवाय तिच्या अब्रूची किंमत ५०० रुपये लावल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. तिच्यावर आठ ठिकाणी नराधमांनी आळीपाळीने बलात्कार केला, तेव्हा एका ठिकाणी बलात्कार झाल्यावर दोघेजण मुख्य आरोपीला ५०० रुपयांच्या दोन नोटा देत होते. तिला जाळ्यात फसविल्यावर तिचा पैसे कमावण्याचे साधन म्हणून आरोपीने वापर केला होता, हेदेखील आता उघड झाले आहे.

गेली नऊ महिने अल्पवयीन पीडितेवर झालेल्या बलात्काराचा व्हिडिओ व्हायरल करण्याची, तसेच ठार मारण्याची धमकी देत नराधमांनी आठ ठिकाणी तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. डोंबिवली पूर्वेकडील नांदीवली, देसलेपाडा, वडवली, मुरबाड येथील फार्म हाऊस, कोळेगाव, बदलापूर सर्कल याठिकाणी या बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. दारू, हुक्का, गुंगीचे औषध जबरदस्तीने पाजून तिच्यावर अत्याचार केला जात होता. दरम्यान मार्च महिन्यात एका ठिकाणी तिच्यावर तब्बल १५ जणांनी बलात्कार केला. यावेळी मुख्य आरोपीस दोघांनी प्रत्येकी ५०० रुपये दिल्याचे पीडित मुलीने मानपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. तिला वेळोवेळी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मुख्य आरोपीकडून बोलावले जायचे, तेव्हाही अशाच प्रकारे तिच्या अब्रूची किंमत लावली गेल्याची सूत्रांची माहिती आहे.

आणखी दोन आरोपींना अटकसामूहिक बलात्काराच्या घटनेत रविवारपर्यंत ३१ नराधमांना अटक केली आहे. यातील दोन आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी भिवंडी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. अजून दोन फरार आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांची विशेष पथके त्यांच्या मागावर आहेत. ३३ नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धककादायक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत २६ जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. यात दोन अल्पवयीन आरोपी होते. शुक्रवारी तिघांना जेरबंद करण्यात आले.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीPoliceपोलिसMONEYपैसाCrime Newsगुन्हेगारी