शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

हत्येनंतरही २ महिने आरोपीनं मृतदेहाला जिवंत भासवलं; कोट्यवधीची संपत्ती हडपण्याचा डाव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 12:26 PM

आरोपीच्या कुटुंबीयांची चौकशी, विशेष म्हणजे संशयित राहुल याने कापडणीस यांच्या मोबाइलचा स्वत: वापर करत त्यांना दोन महिने आभासी जिवंत ठेवले होते. 

नाशिक : मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब रावजी कापडणीस (७०) त्यांचा पुत्र अमित कापडणीस (३५) यांचा पंडित कॉलनीतील त्यांच्याच गोपाळ पार्कमधील इमारतीत राहणारा व्यावसायिक राहुल गौतम जगताप याने दोन महिन्यांपूर्वी हत्या केली. एकाकी जीवन जगणाऱ्या कापडणीस पिता-पुत्रांचा गैरफायदा घेत त्यांची कोट्यवधींची संपत्ती हडपण्यासाठी राहुलने थंड डोक्याने दुहेरी हत्याकांड घडवून आणल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे संशयित राहुल याने कापडणीस यांच्या मोबाइलचा स्वत: वापर करत त्यांना दोन महिने आभासी जिवंत ठेवले होते. 

मोबाइलचा सुरू होता वापरकापडणीस यांच्या शेअर्सच्या डिमट अकाउंटवरून शेअर्स खरेदी-विक्री करणे असो किंवा बँकेचे व्यवहार तसेच त्यांच्या बंगल्याच्या बांधकामाकरिता विविध बांधकाम साहित्य पुरविणाऱ्यांसोबत संपर्क करण्याकरिता संशयित राहुल हा त्यांच्या माेबाइलचा वापर करत होता. यामुळे नानासाहेब कापडणीस जिवंतच आहे, असेच सर्वांना वाटत होते; मात्र त्यांचा गळा आवळून खून करत मृतदेह मोखाड्याच्या घाटात दोन महिन्यांपूर्वीच संशयिताने फेकून जाळून टाकला होता. 

मुदत ठेवींची रक्कमही करणार होता वर्गनानासाहेब कापडणीस यांच्या बँकेतील मुदत ठेवींपैकी ज्यांची मुदत पूर्ण झाली, अशा १५ ते २० लाखांची रक्कमही संशयित राहुल हा स्वत:च्या बँक खात्यात वर्ग करण्याच्या तयारीत होता. कापडणीस यांची ३० लाखांची मुदत ठेव ही मुदतपूर्व असून, त्याचा कालावधी कधी संपणार, याची माहितीही त्याने करून घेतली होती. 

हत्याकांडात वापरलेली कार शोधलीहत्याकांडात आरोपी राहुल गौतम जगताप याने वापरलेली मारुती स्विफ्ट कार पोलिसांनी गुरुवारी शोधून काढली. या कारचा विभागीय न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या पथकाने ऑन द स्पॉट पंचनामा करत धागेदोरे जुळविण्याचा प्रयत्नही केला. जगताप याच्या घरी संध्याकाळी पोलिसांच्या तपास पथकाने धडक दिली. त्याच्या कुटुंबीयांची चौकशी करत घराची झडती घेतली.

बंगल्याचे काम थांबायला नकोगंगापूर पोलीस ठाण्याच्या मागे सावरकरनगर भागात कापडणीस यांच्या तीनमजली बंगल्याचे बांधकाम सुरू आहे. हे काम थांबायला नको, यासाठी संशयित राहुल याने त्यांच्या शेअर्स विक्रीतून मिळविलेल्या ९७ लाखांच्या रकमेतून संबंधित बांधकाम साहित्य पुरविणाऱ्यांना पैसे देत पुन्हा बंगल्याचे बांधकाम पूर्ववत सुरू ठेवले होते. 

२५ लाखांची रेंजरोव्हरराहुलने शेअर्स विक्रीतून मिळालेल्या रकमेतून सुमारे २५ ते ३० लाखांत रेंजरोव्हर कार खरेदी केली होती. या कारचा मालक त्याने त्याच्या भावाला कागदोपत्री दाखविले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी