मुंबई : डॉ. पायल तडवी हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या तीन डॉक्टरांपैकी डॉ. भक्ती मेहर आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांनी आरोपातून मुक्ततेसाठी विशेष न्यायालयात अर्ज केला आहे.डॉ. पायल तडवी हिने दि. २२ मे २०१९ टी. एन. टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहर, डॉ. अंकिता खंडेलवाल यांना अटक केली. पायल सतत तणावाखाली होती आणि ती कामाचा भार सहन करू शकली नाही. त्यामुळे तिने आत्महत्या केली. मला तिची जात माहिती नव्हती, असे खंडेलवाल हिने आरोपमुक्ततेसाठी न्यायालयात केलेल्या अर्जात म्हटले आहे. तर आपल्याविरोधात आरोप निश्चित करण्यासाठी पुरावे नाहीत, असे मेहर हिने अर्जात म्हटले आहे. न्यायालयाने विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांना या अर्जांवर १८ एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले.
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: दोन डॉक्टरांचा आरोपमुक्त करण्यासाठी अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 8:31 AM