शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

खळबळजनक! डाॅ. शीतल आमटे यांनी यापूर्वीही केला होता आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 9:12 PM

Dr. Sheetal Amte Suicide : सहा महिन्यांपासून घेत होत्या मानसाेपचार तज्ज्ञांकडून औषधोपचार

ठळक मुद्दे२१ नोव्हेंबर २०२० रोजी डाॅ. शीतल यांनी त्यांच्या नेहमीच्या फार्मसिस्टकडे प्राणघातक लेथल इंजेक्शन विषयी विचारणा केली होती.

चंद्रपूर : महारोगी सेवा समितीच्या सीईओ डाॅ. शीतल आमटे-करजगी यांच्या मृत्यूचे गुढ कायम असताना त्यांनी जून २०२० मध्ये झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ही धक्कादायक माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. इतकेच नव्हे, तर डाॅ. शीतल आमटे या काही वर्षांपासून मानसिक तणावात होत्या. त्या मृत्यूच्या सहा महिन्यांपूर्वीपासून नागपूर येथील मानसोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेत असल्याची बाबही निष्पन्न झाली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.२१ नोव्हेंबर २०२० रोजी डाॅ. शीतल यांनी त्यांच्या नेहमीच्या फार्मसिस्टकडे प्राणघातक लेथल इंजेक्शन विषयी विचारणा केली होती. काही कुत्रे अल्सरच्या त्रासाने पीडित आहे. त्यांना वाचविण्यात काही अर्थ नाही, असे कारण देत तीन प्रकारचे प्रत्येकी पाच इंजेक्शन मागविले होते. वास्तविक, आनंदवनातील रुग्णालयात अशा प्रकारचे इंजेक्शन सामान्यत: वापरले जात नाही, याकडेही पोलीस अधीक्षक साळवे यांनी लक्ष वेधले.घटनास्थळावरून एका इंजेक्शन चे ॲम्पोल फुटलेल्या स्थितीत आढळले. तसेच वापरलेली सिरींजही मिळून आली होती. मात्र सुसाईड नोट आढळली नाही, ही बाबही पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केली. शवविच्छेदन अहवालानुसार डाॅ. शीतल यांचा मृत्यू श्वास रोखल्यामुळे झाल्याचेही पोलीस अधीक्षक साळवे यांनी स्पष्ट केले. परंतु त्यांच्या उजव्या हातावर इंटरावेनस इंजेक्शनचे व्रण होते. तपासात घातपात झाल्याबाबतचा कोणताही सकृतदर्शनी पुरावा आढळून आला नसल्याचेही पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी यावेळी सांगितले. या प्रकरणात आतापर्यंत २६ साक्षदारांचे बयाण नोंदविले असल्याचे ते म्हणाले.न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे अहवाल अप्राप्तघटनास्थ‌ळावरून जप्त मुद्देमाल, व्हिसेरा रासायनिक परीक्षणासाठी चंद्रपूर व नागपूर येथील न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेला आहे. जप्त ३ मोबाईल, एक लॅपटाॅप, एक टॅबलेटही परीक्षणासाठी मुंबई येथील न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठविले असून एकही अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. अहवालानंतरच या प्रकरणाचे गुढ उकलणार आहे.

टॅग्स :Dr Sheetal Amteडॉ शीतल आमटेSuicideआत्महत्याPoliceपोलिस