चंद्रपुर - महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि डॉ. बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे करजगी यांनी विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे. अलीकडेच समितीमधील पदाधिकारी आणि आमटे कुटुंबातील सदस्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यावर आमटे कुटुंबीयानी निवेदन जारी करून शीतल आमटे यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे सांगितले होते. त्याचप्रमाणे शीतल यांनी केलेल्या आरोपांबाबत असहमती दाखवली होती. दरम्यान, चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. आनंदवनमधील वाद आणि तक्रारी या गंभीर स्वरूपाच्या असून त्यात सरकारने हस्तक्षेप करण्याची वेळ व्यवस्थापनाने येऊ देऊ नये. आमटे कुटुबीयांनी स्वतः पुढाकार घेऊन या वादावर लवकरात लवकर तोडगा काढावा, असे मत त्यांनी व्यक्त केले होते. केवळ राज्यच नाही तर देश-परदेशातून अनेकांनी आमटे कुटुंबातील हे वाद मिटविण्यासाठी पुढाकार घेतला होता. गेल्या अनेक दशकापासून आनंदवनशी जोडलेल्या राज्यातील अनेक कलावतांनी आमटे कुटुंबियांशी चर्चा करून कौटुंबिक कलह संपावेत यासाठी प्रयन सुरू केले होते.
Dr Sheetal Amte Sucide News : धक्कादायक! आनंदवन येथे डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या
ज्येष्ठ समाजसेवकबाबा आमटे आणि साधना आमटे यांनी १९४९ मध्ये या आनंदवनाची स्थापना केली. त्यामुळे संपूर्ण समाज नाकारत असलेल्या कुष्ठरोग्यांना याठिकाणी आश्रय मिळाला. बाबांनी त्यांची सेवा केली. त्यांना जगण्याची नवी प्रेरणा दिली. मात्र कुष्ठरोग्यांवर उपचार करणारे केंद किंवा रुग्णालय होऊ नये याकडेही बाबंनी लक्ष दिले होते. त्यातूनच त्यांनी कुष्ठरोग्यांच्या श्रमातून औद्योगिक वसाहत उभी केली. त्याचबरोबर साधना आमटे यांनी देखील कष्ट करून दोघांच्या मेहनतीने आनंदवन उभे राहिले. समाजाने नाकारलेल्या कुष्ठरोग्यांना स्वयंपूर्ण करून जगायला त्यांनी शिकविले. बाबा आणि साधना आमटे यांच्या निधनानंतर आनंदवनची सूत्रे त्यांचे सुपुत्र विकास आमटे यांच्याकडे सोपवण्यात आली. त्यांनी काही काळ कारभार साभाळल्यानंतर त्यांचा मुलगा कौस्तुभ यांची महारोगी सेवा समितीवर नियुक्ती करण्यात आली. मात्र, मूलगी शीतल आमटे करजगी यांना समितीवर स्थान दिले गेले. आमटे कुटुंबातील वादामुळे मुलाचा कारभार काढून मुलीला सोपविल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या.