मुंबई- महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) मुंबई विभागाने ३६ वर्षाच्या रोहन गवांसला अटक केली आहे. या तरुणाकडून ३५ लाख रुपयांचे ३२० ग्रॅम मेथामॅफेटॅमिन हा अमली पदार्थ जप्त केला. मेथामॅफेटॅमिन या अमली पदार्थावर देशात बंदी आहे. याआधी २०१५ मध्ये रोहनला मेफेड्रोन या अमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी अटक झाली होती.
आरोपीने स्वतःच्या कारमध्ये एका छुप्या कप्प्यात अमली पदार्थ लपवला होता. अचूक माहितीआधारे डीआरआयने वॉरंट बजावून आरोपीला त्याची कार दाखवण्यास सांगितले. सोसायटीतील सदस्यांच्या उपस्थितीत कारची सखोल तपासणी केल्यावर अमली पदार्थांचा साठा मिळाला. या प्रकरणी अमली पदार्थ कायद्यांतर्गत (एनडीपीएस) गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात आली. भारतात मेथामॅफेटॅमिन हे 'स्पीड' आणि 'आईस' या दोन नावांनी उच्चभ्रूंच्या पार्ट्यांमध्ये विकले जाते. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच देशात मेथामॅफेटॅमिन जप्त झाले आहे. या प्रकरणात अटक झालेल्या रोहन गवांस याची सखोल चौकशी सुरू आहे. रोहन अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या लोकांपैकी एक आहे. त्याच्या चौकशीतून तस्करांच्या जाळ्याविषयी आणखी माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आरोपी रोहन गवांसला अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी १३ मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
Coronavirus : मौलाना साद यांची चौकशी करणारे पोलिसच कोरोनाच्या विळख्यात, चार जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह