शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

DRI ची मोठी कारवाई! JNPT बंदरातून ८७९ कोटींचे अमली पदार्थ जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2021 9:53 PM

DRI seized Drugs : या कंटेनरची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये सुमारे २९३ किलो किलो हेरॉईन सापडले. जप्त केलेल्या हेरॉईनची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात ८७९ कोटी रुपये इतकी आहे. 

ठळक मुद्दे अफगाणिस्तानातून तुरटी व टॅल्कम पावडर घेऊन इराणमधील बंदराच्या मार्गाने आलेल्या एका कंटेनरवर डीआरआय आणि सीमा शुल्क अधिकार्‍यांना संशय आला. 

समुद्री मार्गाने मुंबईत मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ दाखल होणार असल्याची गुप्त माहिती डीआरआयला (DRI) मिळाली होती. याआधीही परदेशातून आयात करण्यात आलेल्या मालाच्या आडून अमली पदार्थांच्या तस्करीच्या घटना समोर आल्याने डीआरआयकडून जेएनपीटीत उतरलेल्या मालाची पाहणी सुरू करण्यात आली होती. त्यामध्ये अफगाणिस्तानातून तुरटी व टॅल्कम पावडर घेऊन इराणमधील बंदराच्या मार्गाने आलेल्या एका कंटेनरवर डीआरआय आणि सीमा शुल्क अधिकार्‍यांना संशय आला.  या कंटेनरची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये सुमारे २९३ किलो किलो हेरॉईन सापडले. जप्त केलेल्या हेरॉईनची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात ८७९ कोटी रुपये इतकी आहे. 

या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली. जेएनपीटीत उतरविण्यात आलेले हे हेरॉईन मुंबई आणि दिल्लीसारख्या मोठ्या शहरात नंतर वितरीत होणार होते. हा माल कोणत्या कंपनीने मागविला होता, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. मात्र या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षीही जेएनपीटी बंदरात १९१ किलो इतके हेरॉईन सापडले होते. आयुर्वेदिक उपचारांसाठी वापरल्या जाणार्‍या मुलेठीच्या आयातीच्या आडून ही तस्करी करण्यात आली होती. गेल्या काही वर्षात समुद्री मार्गाने भारतात अमली पदार्थांची तस्करी वाढली आहे. 

गेल्या सहा महिन्यात सुमारे ५ हजार कोटींचे अमली पदार्थ भारतीय समुद्री क्षेत्रात तटरक्षक दल व नौदलाने कारवाईत जप्त केले आहेत. मार्च महिन्यात लक्षद्विपजवळ एका श्रीलंकन बोटीतून ३०० किलो हेरॉईनसह पाच एके-४७ रायफली जप्त करण्यात आल्या होत्या.

टॅग्स :Drugsअमली पदार्थJNPTजेएनपीटीDirectorate of Revenue Intelligenceमहसूल गुप्तचर संचालनालयAfghanistanअफगाणिस्तान