मुंबई - विदेशी महागड्या सिगरेटची तस्करी करणाऱ्या आरोपींना पकडण्यात महसुल गुप्तवार्ता संचलनालयाला (डीआरआय) ला यश आले असून त्यांच्याकडून 11 कोटी 88 लाख 28 हजार 800 रुपये किंमतीच्या सिगरेट जप्त करण्यात आल्या आहेत. न्हावाशेवा बंदरात आलेल्या कंटेनरमधून ही तस्करी करण्यात आली. 32 हजार 640 बॉक्समधून 71 लाख 61 हजार 600 सिगरेट आणण्यात आले. कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये विदेशी सिगरेट सहजासहजी उपलब्ध नसल्याने चढ्या दराने त्याची विक्री केली जात होती त्यासाठी मोठ्या प्रमाणात अवैध रित्या सिगरेट आणण्यात आल्या. मनिष शर्मा (31 ) व आणि सुनील वाघमारे (29) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे आरोपी चेंबूर येथील आहेत. 600 मास्टर बॉक्स भरुन या सिगरेटची तस्करी करण्यात आली. डीआरआयचे सहसंचालक समीर वानखेडे यांनी या माहितीला दुजोरा दिला.
खजूराच्या नावावर सिगरेट आणण्यात आल्या. या बॉक्समधून गुडांग गरम, डनहिल स्विच, हड्ज या सारख्या परदेशी सिगरेटची तस्करी करण्यात आली. शर्मा हा आरोपी वाघमारेकडून वीजेचे बिल, पॅनकार्ड अशी कागदपत्रे घेऊन त्याच्या सहाय्याने बनावट कंपन्यांसाठी जीएसटी व आयात निर्यात क्रमांक मिळवून देत असल्याचे तपासात समोर आले आहे. 40 फूट कंटेनरमध्ये या सिगरेट भरण्यात आल्या होत्या. अटक आरोपींना 26 जून पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
... हा तर टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार, बापाच्या मृत्यूनंतरही मुलाने ८ वर्ष उकळली ९२ लाख पेन्शन
काबुल हादरलं! नमाजावेळी मशिदीत IED स्फोट, इमामासह चौघांचा मृत्यू
थरारक! ४ वर्षांच्या मुलीसह दोन भावंडं २ तास अडकले लिफ्टमध्ये, कासावीस झालेल्यांची दरवाजा कापून केली सुटका
न्यूड व्हिडीओ कॉल करून नर्सला वॉर्डबॉयने केले अशा प्रकारे ब्लॅकमेल
ले साले दारू पी...म्हणत झाले दारुड्या मित्रांमध्ये कडक्याने भांडण अन् हाणला हातोडा
पोलिसांचा असा घेतला बदला; क्वारंटाईन सेंटरच्या पाण्याच्या टाकीत विष मिसळले
थरारक हत्याकांड! सपासप चाकूने वार करून चिमुकलीचा आईने घेतला जीव नंतर संपविले स्वतःला
Ajay Pandita Murder : भ्याड दहशतवाद्यांनो! हिम्मत असेल समोर या, मी तुम्हाला सोडणार नाही