वास्को - गोव्याच्या दाबोळी विमानतळावरून सोमवारी (दि.१४) मध्यरात्री कतार एअरवेज विमानातून दोहा राष्ट्रात जाण्याच्या तयारीत असलेल्या ३६ वर्षीय शरीफ पांडु शेख याच्या सामानात ३ किलो ५१८ ग्राम हशीश (चरस) हा अमली पदार्थ असल्याचे उघड होताच त्याला ताब्यात घेण्यात आला. बिचोली येथे राहणारा शरीफ याच्या सामानाची विमानतळावर तपासणी करण्यात येत असताना राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक चंद्रा भूषण याला संशय आल्याने त्याच्या सामानाची तपासणी केली असता यात १७ लाख ५९ हजाराला अमली पदार्थ असल्याचे स्पष्ट झाले.दाबोळी विमानतळावरील राष्ट्रीय सुरक्षा औद्योगिक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार सोमवारी मध्यरात्री २.२० च्या सुमारास सदर कारवाई करण्यात आली. मध्यरात्री ३.४० वाजता दाबोळीवरून दोहा येथे जाणार असलेल्या कतार एअरवेझ च्या ‘क्यु.आर - ५२३’ ह्या विमानातून जाणार असलेल्या प्रवाशांच्या सामानाची ‘एक्स - रे’ मशीनात तपासणी करण्यात येत असताना एका बॅगेत असलेल्या सामानाबाबत राष्ट्रीय सुरक्षा औद्योगिक दलाचे उपनिरीक्षक चंद्र भूषण याला संशय आला. त्यांने त्वरित सदर बॅग कुठल्या प्रवाशाची आहे याची चौकशी केली असता ती बिचोली येथे राहणाऱ्या शरीफ शेख याच्या मालकीची असल्याचे आढळून आले. शरीफ याला ती बॅग उघडण्यास लावली असता त्यात वेगवेगळ््या प्लास्टिक पिशव्यात काळ््या रंगाचा माल बंद करून ठेवण्यात आल्याचे आढळून आले. हा माल अमली पदार्थ असल्याचा संशय वाढल्याने याची दलाच्या अधिकाºयांनी अमली पदार्थ चाचणी यंत्राद्वारे तपासणी केली. ह्या तपासणीत सदर माल हशीश हा अमली पदार्थ असल्याचे उघड झाल्यानंतर याबाबत राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या अधिकाºयांनी वरिष्ठ अधिकाºयांना माहीती देऊन त्वरित शरीफ याला ताब्यात घेतला.दाबोळी विमानतळावर सोमवारी मध्यरात्री पकडण्यात आलेला हा अमली पदार्थ ३ कीलो ५१८ ग्राम वजनाचा असल्याची माहीती सूत्रांनी देऊन त्याची रक्कम १७ लाख ५९ हजार असल्याचे सांगितले. दाबोळी विमानतळावरून विदेशात अमली पदार्थ घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या बिचोली येथील शरीफ याला नंतर विमानतळावरील राष्ट्रीय सुरक्षा औद्योगिक दलाने ‘नारकोटीक कंन्ट्रोल ब्युरो’ विभागाच्या ताब्यात दिला असून ह्या विभागाने सदर अमली पदार्थ जप्त सुद्धा केला असल्याचे सूत्रांनी कळविले. अमली पदार्थाच्या प्रकरणात गजाआड करण्यात आलेला संशयित शरीफ हा अमली पदार्थ विदेशात कशासाठी नेत होता तसेच हा माल त्यांने कुठून मिळवीला याबाबत सध्या तपास चालू असल्याची माहीती सूत्रांनी दिली.
दाबोळी विमानतळावर प्रवाशाकडून साडे सतरा लाखाचा अमली पदार्थ जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 10:41 PM