शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

ललित पाटीलच्या चौकशीत धक्कादायक खुलासे; दरमहा किती कमवायचा?, आकडा वाचून चक्रवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 10:52 AM

नाशिकच्या कारखान्यात एमडी ड्रग्ज बनवण्यात यायचे आणि ते देशभरात पुरवले जायचे

मुंबई – ड्रग्ज प्रकरणात पुण्याच्या ससून रुग्णालयातून फरार झालेल्या ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी चेन्नईतून अटक केली. सोमवारपर्यंत ललितला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या पोलीस ललित पाटील आणि ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करत आहे. या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे समोर आलेत. नाशिकमध्ये उभारलेल्या ड्रग्जच्या कारखान्यातून ललित आणि त्याचा भाऊ भूषण पाटील महिन्याला ५० लाखांची कमाई करत असल्याचे उघड झाले आहे.

नाशिकच्या कारखान्यात एमडी ड्रग्ज बनवण्यात यायचे आणि ते देशभरात पुरवले जायचे. या कारखान्यात दरमहा ५० किलो एमडी तयार केले जायचे. त्यातून पाटील बंधुंनी लाखोंची कमाई दर महिन्याला केली. हे पैसे सोन्यात गुंतवल्याची माहिती समोर आली आहे. ललितचा भाऊ भूषण आणि मित्र अभिषेक बलकवडे याच्या मदतीने कारखाना उभारण्यात आला. २०२१ पासून हे सुरू होते. ५ ऑक्टोबरला मुंबईतील साकिनाका पोलिसांनी याठिकाणी धाड टाकत जवळपास २००-३०० कोटींचे ड्रग्ज पकडले होते. त्यानंतर हा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त करण्यात आला. एमजी ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल आणि साहित्य पोलिसांकडून जप्त करण्यात आले.

नाशिकच्या या कारखान्यातून एमडी ड्रग्जचा सप्लाय मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि नाशिकसह इतर राज्यातील अनेक शहरांमध्ये केला जायचा. ड्रग्स पेडलर्सच्या माध्यमातून ही साखळी ड्रग्स विक्री करत होती. यातून ललित आणि भूषण पाटीलला दरमहा ५० लाख रुपये कमाई मिळायची. आतापर्यंत पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणी १५ जणांना अटक केली आहे. आणखीही काहीजण पोलिसांच्या रडारवर आहे. त्याचसोबत आणखी मोठी नावे या प्रकरणात समोर येऊ शकतात असं बोलले जात आहे.

सुरुवातीच्या काळात या कारखान्यात कमी प्रमाणात एमडी बनवले जायचे. परंतु कालांतराने मागणी वाढल्याने पुरवठाही वाढवण्यास आला. एमडी कारखान्यात तयार केल्यानंतर ते विक्री करण्याची जबाबदारी २-३ जणांवर होती. एमडी ड्रग्जची किंमत जास्त असली तरी त्याची तरुणांकडून सर्वाधिक मागणी आहे. त्याचसोबत अनेक पार्ट्यांमध्ये एमडी ड्रग्ज वापरले जाते. त्यामुळे ललित आणि भूषणने एमडी बनवण्याचं तंत्र शोधून कारखानाच काढला. आता कमावलेल्या पैशातून ललितने कुठे आणि कशी गुंतवणूक केली याचा पोलीस शोध घेत आहेत.  

टॅग्स :Lalit Patilललित पाटीलMumbai policeमुंबई पोलीसDrugsअमली पदार्थ