शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

नागपुरात पोलिसांनी थंडीत फोडला मद्यपींना घाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 10:16 PM

थर्टी फर्स्टसाठी पोलिसांनी मजबुत व्यूहरचना करून मंगळवारी दिवसभर आणि पहाटेपर्यंत कारवाई करून मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या ५९२ वाहन चालकांवर कारवाई करून थंडीत त्यांना घाम फोडला.

ठळक मुद्दे५९२ वाहनचालकांवर कारवाई : पहाटेपर्यंत होते पोलीस सक्रिय

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर. थर्टी फर्स्टसाठी पोलिसांनी मजबुत व्यूहरचना करून मंगळवारी दिवसभर आणि पहाटेपर्यंत कारवाई करून मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या ५९२ वाहन चालकांवर कारवाई करून थंडीत त्यांना घाम फोडला. पोलिसांनी कडक बंदोबस्त लावल्यामुळे नवे वर्ष साजरे करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या युवकांनी शांततेने नव्या वर्षाचे स्वागत केले. त्यामुळे शहरात कोणतीही मोठी घटना किंवा अपघात झाला नाही.नव्या वर्षाचे स्वागत करताना अनेकदा काहीजण धुडगूस घालतात. अशा व्यक्तींचा बंदोबस्त करणे पोलिसांसाठी तारेवरची कसरत ठरते. यामुळे पोलिसांनी शहराच्या कानाकोपऱ्यात कडेकोट बंदोबस्त लावला होता. पोलिसांची वाहने गस्त घालत होती. मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पथक तैनात केले होते. पोलिसांना वाहन चालकांनी तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. यामुळे अनेकांनी घरीच बसून नववर्षाचे स्वागत करण्याला पसंती दिली. परंतु मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या ५९२ जणांवर कारवाई केली. मागील वर्षी ३१ डिसेंबरला १०६४ वाहनचालकांवर ड्रंक अँड ड्राईव्ह अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. बहुतांश मद्यपी वाहनचालक रस्त्यावर न उतरल्यामुळे शहरात कोणताही अपघात झाला नाही. पोलीस आयुक्त डॉ. भुषणकुमार उपाध्याय, सह आयुक्त रवींद्र कदम यांनी रात्री उशिरापर्यत रस्त्यावर उतरून नागरिकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. ड्रंक अँड ड्राईव्हची सर्वाधिक ८५ कारवाई वाहतूक शाखा कामठी झोनने केली. त्यानंतर इंदोराने ८०, लकडगंज ६०, एमआयडीसी ६३, सोनेगाव ४३, सीताबर्डी ५०, सदर ४८, कॉटन मार्केट ५९, सक्करदरा ५६, अजनीत ४८ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. पोलिसांनी असामाजिक तत्वांविरुद्ध अभियान राबविले होते. अवैध धंद्याशी निगडीत गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई सुरु केली होती. त्यांना सक्त ताकद देण्यात आली होती. यामुळे बहुतांश अवैध धंदे चालविणारे संचालक दोन-तिन दिवसांपासून शांत झाले होते.नागरिकांचे मानले आभारपोलीस आयुक्त डॉ. भुषण कुमार उपाध्याय यांनी नव्या वर्षाचे स्वागत करताना पोलिसांना सहकार्य करण्यासाठी नागरिकांचे आभार मानले आहेत. नागरिकांनी सहकार्य केल्यामुळे पोलिसांचे काम सोयीस्कर झाले असून नागरिकांनी भविष्यातही अशा प्रकारचे सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Drunk And Driveड्रंक अँड ड्राइव्हNew Yearनववर्ष