गुंडगिरी! 'आम्ही सरकार, तुम्ही नोकर'; मंत्र्याचा पुतण्या असल्याचं सांगत तरुणाची पोलिसांना शिवीगाळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 10:22 AM2022-02-02T10:22:06+5:302022-02-02T10:23:21+5:30

Crime News : तरुणाने त्याला रोखण्यासाठी आलेल्या पोलिसांनाच धमकावलं, गैरवर्तन केलं, अपशब्द वापरत शिवीगाळ केली आणि नंतर स्वत:ला पंचायत मंत्र्यांचा पुतण्या असल्याचं सांगितलं.

drunk man udayraj singh abuse police went to stop dj claim mahendrasingh sisodia bhatija viral video | गुंडगिरी! 'आम्ही सरकार, तुम्ही नोकर'; मंत्र्याचा पुतण्या असल्याचं सांगत तरुणाची पोलिसांना शिवीगाळ 

गुंडगिरी! 'आम्ही सरकार, तुम्ही नोकर'; मंत्र्याचा पुतण्या असल्याचं सांगत तरुणाची पोलिसांना शिवीगाळ 

googlenewsNext

नवी दिल्ली - मध्य प्रदेशच्या राजगडमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. एका तरुणाने थेट पोलिसांसमोरच दादागिरी केल्याचं पाहायला मिळालं. 'आम्ही सरकार, तुम्ही आमचे नोकर', मी मंत्र्याचा पुतण्या आहे असं सांगून त्याने पोलिसांनाच शिवीगाळ केल्याचं समोर आलं आहे. या धक्कादायक घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील राजगडमध्ये एका लग्न समारंभात रात्री उशिरापर्यंत डीजे वाजत होता. त्यामुळे पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. 

उदयराज सिंह नावाच्या तरुणाने त्याला रोखण्यासाठी आलेल्या पोलिसांनाच धमकावलं, गैरवर्तन केलं, अपशब्द वापरत शिवीगाळ केली आणि नंतर स्वत:ला पंचायत मंत्र्यांचा पुतण्या असल्याचं सांगितलं. धमकी आणि तिथल्या वातावरणामुळे पोलीस तेथून परतले मात्र हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. "सरकार आमचे आणि आम्ही सरकार. येथे महेंद्रसिंग सिसोदिया यांचे पुतणे आहेत. तुम्ही बोलवा, इथे टीआय कोण आहे? हो बोलवा येथे. सरकार आमचे आहे आणि तुम्ही आमचे नोकर आहात" असं म्हटलं आहे. 

मंत्री म्हणतात, हा तरुण माझा पुतण्या नाही 

डीजे बंद करायला सांगणाऱ्या पोलिसांना स्वतःला पंचायत मंत्र्याचा पुतण्या म्हणणाऱ्या या व्यक्तीने अश्लील भाषेत शिवीगाळ केली. य़ा घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रकरण एसपी आणि मंत्र्यांपर्यंत पोहोचले. मंत्र्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. हा तरुण माझा पुतण्या नाही असं त्यांनी म्हटलं आहे. पोलिसांनी तरुणांविरुद्ध एफआयआर नोंदवून कारवाई करण्याची तयारी केली होती. मात्र त्याचवेळी उदयराज सिंह नावाच्या या तरुणाला आपली चूक लक्षात आली आणि त्यांने मीडियासमोर माफी मागितली.

तरुणाने मागितली माफी

पोलिसांना धमकी देणाऱ्या उदयराज सिंहने माफी मागत आपली चूक कबूल केली आहे. "मी मंत्र्याचा पुतण्या नाही, तो आमच्या भागाचा आमदार आहे. रागाच्या भरात मी हे सर्व बोललो, त्याबद्दल मी आता माफी मागतो" असं म्हटलं आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ते याचा अधिक तपास करत आहेत. या घटनेची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

Web Title: drunk man udayraj singh abuse police went to stop dj claim mahendrasingh sisodia bhatija viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.