पुणे : वेगवेगळ्या कंपन्यांची स्थापना करून कोट्यवधी रुपयांच्या ठेवीदार गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेले बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डीएसके) आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांचा जामीन अर्ज शुक्रवारी न्यायालयाने फेटाळला आहे.सई वांजपे यांच्या नियमित जामिनावर तर तन्वी कुलकर्णी, स्वरूपा कुलकर्णी, अश्विनी देशपांडे यांच्या अटकपूर्व जामिनावर अद्याप निकाल झालेला नाही. सत्र न्यायाधीश जयंत राजे यांनी हा आदेश दिला. डीएसके यांचा मुलगी शिरीष यांनी देखील जामिनासाठी अर्ज केला आहे. मात्र त्यांच्या अर्जावर युक्तिवाद न केल्याने त्यावर तूर्तास निर्णय होणार नाही. जामीन अर्ज फेटाळल्याने डीएसके यांचा कोठडीतील मुक्काम वाढणार आहे.डीसके यांच्याकडे 6हजार 671 ठेवीदारांनी 448 कोटी 71 लाखांच्या ठेवी ठेवलेल्या आहेत.. तर त्यांना 416 व्यक्ती व संस्थांनी कर्ज दिले असून त्याची रक्कम 122 कोटी 38 लाखांच्या घरात आहे. न्यायालयाने वेळोवेळी मुदत देऊनही डीसके यांच्याकडुन ठेवीदारांना परतावा मिळाला नाही.. त्यांनी वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करताना पब्लिक प्रा. लि. नावाने उभारल्या असून त्याद्वारे भागधारकांकडुन पैशांची उभारणी केली . पदाचा गैरवापर करत त्यांनी भागधारकांचा पैसा वैयक्तिक कारणाकरिता तसेच स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता वापरला असा आरोप करत ठेवीदारांनी डीसके यांच्याविरुद्ध कोर्टात धाव घेतली आहे..
डीएसके आणि त्यांच्या पत्नीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 5:56 PM