अंडरवेअरवर DSPने शेजाऱ्याला केली मारहाण, कारण होतं BMW वर पडली धूळ; VIDEO व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 10:21 PM2021-12-28T22:21:48+5:302021-12-28T22:22:09+5:30

Indore Viral DSP Video: वाद टोकाला पोहोचला. व्हिडिओमध्ये मारहाण करणारा डीएसपी अंडरवेअरवर या तरुणाला मारहाण करत आहे.

DSP beats neighbor over underwear, causing dust on BMW; VIDEO VIRAL | अंडरवेअरवर DSPने शेजाऱ्याला केली मारहाण, कारण होतं BMW वर पडली धूळ; VIDEO व्हायरल

अंडरवेअरवर DSPने शेजाऱ्याला केली मारहाण, कारण होतं BMW वर पडली धूळ; VIDEO व्हायरल

Next

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये सर्वसामान्यास घर बांधणे महागात पडले आहे. वास्तविक, बांधकाम सुरू असलेल्या घरातून डीएसपीच्या बीएमडब्ल्यू कारवर धूळ उडाली होती. यानंतर दोघांमध्ये वाद झाला. नंतर वाद टोकाला पोहोचला. व्हिडिओमध्ये मारहाण करणारा डीएसपी अंडरवेअरवर या तरुणाला मारहाण करत आहे.

मारहाण झालेल्या तरुणाच्या घरी बांधकाम सुरू होते. मारामारीदरम्यान डीएसपीची लुंगी सुटली. यानंतरही तो अंडरवेअरवर मारहाण करताना दिसत आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

 
खरंतर, हे संपूर्ण प्रकरण इंदूरच्या कनडिया पोलीस स्टेशन हद्दीतील लक्ष्य विहार कॉलनीचे आहे. डीएसपी वेदांत शर्मा यांचे घर लक्ष्य विहार कॉलनीत आहे. वेदांत शर्मा सध्या उज्जैन लोकायुक्तमध्ये डीएसपी म्हणून कार्यरत आहेत. संदीप विज यांचे घर त्यांच्या घराशेजारी आहे. संदीप गुजरातमध्ये काम करतो, त्याच्या घरात बांधकाम सुरू आहे. त्यामुळे डीएसपी वेदांत शर्मा यांच्या बीएमडब्ल्यू कारवर धूळ उडाली. यावर डीएसपी कामगारांना खडेबोल सुनावू लागले. मजुरांनी ही माहिती घरमालक संदीप विज यांना दिली. हे प्रकरण सोडवण्यासाठी संदीप विज इंदूरला पोहोचले. संदीप विज शेजारच्या डीएसपीकडे पोहोचल्यावर दोघांमध्ये वाद सुरू झाला. या वादाचे विपर्यासन मारामारीत झाले. याप्रकरणी दोन्ही पक्षांनी कानडीया पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. मात्र, पोलिसांनी या प्रकरणी कोणताही एफआयआर दाखल केलेला नाही.

Web Title: DSP beats neighbor over underwear, causing dust on BMW; VIDEO VIRAL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.