शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
4
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
5
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
6
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
7
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
8
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
9
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
10
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
11
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
12
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
13
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
14
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
15
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
16
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
17
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
18
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
19
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
20
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध

कर्जाची रक्कम घेऊन पसार झालेल्या नोकराला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 3:30 AM

कामासाठी मित्राकडून घेतलेल्या कर्जाची २४ लाखांची रक्कम नोकरामार्फत व्यापाऱ्याने परत पाठविली.

मुंबई : कामासाठी मित्राकडून घेतलेल्या कर्जाची २४ लाखांची रक्कम नोकरामार्फत व्यापाऱ्याने परत पाठविली. मात्र, नोकर ते पैसे घेऊन पसार झाला. या प्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर, वाराणसीतून त्याला अटक करण्यात आली आणि चोरीच्या रकमेपैकी ९० टक्के रक्कम हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.दिनेश जैस्वार असे अटक आरोपीचे नाव आहे. कांदिवली पश्चिमेच्या एका प्लायवूडच्या दुकानात गेली दोन वर्षे तो काम करत आहे. दुकानाचे मालक कांतीलाल पटेल यांनी जैस्वारला गेल्या आठवड्यात २४ लाख रुपये दिले. त्यांनी ते पैसे त्यांचा महावीरनगर परिसरात राहणारा मित्र भावेश शाह यांच्याकडून कामानिमित्त घेतले होते. त्यामुळे ते शाह यांना परत नेऊन देण्यास त्याला सांगण्यात आले. मात्र, जैस्वार पैसे घेऊन पसार झाला. पटेल यांनी त्याला बºयाचदा फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा मोबाइल बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही. त्यांनी शाह यांच्याकडे विचारणा केली असता, जैस्वार त्यांच्याकडे पैसे घेऊन आलाच नसल्याने त्यांना समजले. अखेर पटेल यांनी कांदिवली पोलिसांत तक्रार केली.तपासात जैस्वार वाराणसीला पळून गेल्याचे समजताच, परिमंडळ ११चे पोलीस उपायुक्त संग्रामसिंग निशाणदार आणि कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पोंदकुले यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक वाराणसीला रवाना झाले. तेथून नातेवाइकांकडे लपून बसलेल्या जैस्वारला सापळा रचून अटक त्यांनी केली.

टॅग्स :ArrestअटकCrime Newsगुन्हेगारी