सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला जावा यासाठी राजकीय आणि बॉलिवूडकरांकडून वारंवार मागणी केली जात आहे. मुंबई उच्च न्यायालयात याप्रकरणी आज सुनावणी पार पडणार होती. मात्र मुंबईत काल संध्याकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे या सुनावणीला फटका बसला आहे. मुंबईत सोमवारी संध्याकाळपासून मुसळधार पाऊस सुरु असून जनजीवन विस्कळीत झालं. त्यामुळे सुशांत प्रकरण सीबीआयकडे तपास सोपवण्याच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
सुशांतने १४ जून रोजी वांद्रे येथील आपल्या राहत्या घऱी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुशांतवर मानसिक दबाव असल्याने आत्महत्या केल्याचा आरोप केला जात आहे. याप्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत. दुसरीकडे सुशांतच्या वडिलांनी पाटणा पोलीस ठाण्यात रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल केली असल्याने बिहार पोलीसही तपास करत असून मुंबईत दाखल झाले आहेत. दुसरीकडे या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी वारंवार केली जात असताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी देखील सीबीआय चौकशीसाठी शिफारस केली आहे. त्यामुळे सुशांत आत्महत्या प्रकरणाला वेगवेगळी वळणं पाहायला मिळत आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना २ वर्ष तडीपारीची नोटीस; ५ जिल्ह्यातून हद्दपार होण्याचे आदेश
गोरखपूर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर; राम मंदिर भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी
नवव्या पतीनं केली हत्या, अनैतिक संबंधांतून गळ्यावरून फिरवला सुरा
थरारक! मित्रानेच मित्राची चाकूने भोसकून केली हत्या
"सुशांतचे वडील म्हणताहेत ते खरं नाही, कुठलीही लेखी तक्रार केलेली नाही!"- मुंबई पोलीस
आजारपणाला कंटाळून वृद्ध महिलेने गळफास घेऊन केली आत्महत्या