मुंबई : यूट्यूबवर व्हिडीओ बघून जमीन खरेदीचा व्यवहार करणे मुंबई पोलिस दलातील सहायक पोलिस उपनिरीक्षकाला महागात पडला आहे. याप्रकरणी अंकुर चक्रवर्ती नावाच्या व्यक्तीविरोधात भोईवाडा पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे.
नायगाव येथे राहणारे तक्रारदार सहायक पोलिस उपनिरीक्षक यांनी २०२० मध्ये अलिबागमध्ये जागा विक्रीसाठी उपलब्ध असल्याचा व्हिडीओ यूट्यूबवर पाहिला. त्यात दाखवण्यात आलेल्या चक्रवर्ती नावाच्या व्यक्तीला त्यांनी मोबाइलवर यासंदर्भात विचारणा केली.
त्यानुसार चक्रवर्तीने तक्रारदार यांना काही प्लॉट दाखविले. व्यवहार ठरल्यानंतर तक्रारदाराने त्याला चार लाख रूपये दिले. मात्र चक्रवर्तीने जमीन विकल्याचे सांगत दहा हजार परत केले. पण उर्वरित रक्कम दिलीच नाही.