शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

एटीएमच्या विड्राल सिस्टिममध्ये फेरफार करुन बँकांना लाखोचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 21:58 IST

एकाला मुंबईतून अटक : ज्या बँकेचे एटीएम त्यांची होत होती फसवणूक

ठळक मुद्दे न्यायालयाने अधिक तपासासाठी त्याला २७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. स्टेट बँकेची १४ एटीएम कार्ड सापडली आहेत त्याने आणखी काही ठिकाणाहून वेगवेगळ्या बँकांची फसवणूक केली असल्याची शक्यता आहे. 

पुणे - एटीएम मशीनच्या विड्राल सिस्टिममध्ये फेरफार करुन बँकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या एकाला सायबर पोलिसांनीमुंबईहूनअटक केली आहे. सत्यव्रत्त पी़ कौशलप्रसाद द्विवेदी (वय २३, रा़ मोतीयान टोला, शंकरगढ, अलाहाबाद, उत्तर प्रदेश) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी विश्वेश्वर सहकारी बँकेच्या वतीने रवींद्र पवार यांनी फिर्याद दिली होती़. हा प्रकार १६ ते १८ जून दरम्यान बँकेच्या चिंचवड, पिंपळे सौदागर आणि बाणेर ब्रँचच्या एटीएम सेंटरमध्ये घडला होता. त्याने स्टेट बँकेच्या ५ एटीएम कार्डचा वापर करुन १ लाख ४० हजार रुपये काढून घेऊन फसवणूक केली होती. याप्रकरणाचा तपास करीत असताना पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांनी तांत्रिक विश्लेषण करुन तसेच एटीएमचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यावर द्विवेदी हा मुंबईतील अंधेरी पूर्व येथे असल्याची माहिती मिळाली़. त्यानुसार पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे, उपनिरीक्षक किरण औटी, पोलीस कर्मचारी नवनाथ जाधव, शिरीष गावडे, अश्विन कुमकर, नितीन चांदणे यांच्या पथकाने अंधेरी येथे जाऊन द्विवेदी याला पकडले़  त्याच्या घरातून स्टेट बँकेची १४ एटीएम कार्ड हस्तगत केली आहे.  न्यायालयाने अधिक तपासासाठी त्याला २७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. पैसे काढताना होत असे रिव्हर्स ट्रान्झाक्शनद्विवेदी हा पदवीधर आहे़ तो मित्र नातेवाईक यांना वेगवेगळी कारणे सांगून त्यांची एटीएम कार्ड मागून घेत असत़ त्यानंतर तो  स्टेट बँकेचे एटीएम कार्ड वापरुन तो इतर बँकांच्या एटीएम सेंटरमध्ये जात. कार्ड टाकून रक्कम काढताना, त्यावेळी तो व्यवहारामध्ये फेरफार करीत असे त्यामुळे त्याला एटीएम मशीनमधून पैसे मिळाले तरी स्टेट बँकेच्या अकाऊंटवर रिव्हर्स ट्रान्झाक्शन दाखविले जात़ त्यामुळे स्टेट बँकेचे ज्याचे कार्ड वापरले, त्याच्या खात्यातून पैसे कट होत नव्हते़ मात्र, तो ज्या बँकेच्या एटीएममधून हे पैसे काढत असे, त्या बँकेला त्याचा आर्थिक फटका बसत असे सायबर पोलिसांकडे आतापर्यंत विश्वेश्वर सहकारी बँकेच्या वेगवेगळ्या एटीएम सेंटरमधून रक्कम काढून फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.  त्याच्याकडे स्टेट बँकेची १४ एटीएम कार्ड सापडली आहेत त्याने आणखी काही ठिकाणाहून वेगवेगळ्या बँकांची फसवणूक केली असल्याची शक्यता आहे. 

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकMumbaiमुंबईPuneपुणे