शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

लॉकडाऊनदरम्यान उपअभियंता एक लाखाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2020 10:30 PM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व आस्थापनांनी ‘वर्क फ्रॉम होम’ ही कार्यप्रणाली अवलंबिली आहे.

ठळक मुद्दे हर्सूल मध्यवर्ती कारागृहात सदरील ठेकेदाराने ७० टक्के काम पूर्ण केले आहे.प्रलंबित बिले मंजूर करण्यासाठी बिरारे याने ठेकेदाराकडे १ लाख २५ हजार रुपयांची मागणी केली.

औरंगाबाद : हर्सूल कारागृहात केलेल्या बांधकामाचे प्रलंबित बिल मंजूर करण्यासाठी ठेकेदाराकडून एक लाख रुपयांची लाच घेताना सार्वजनिक बांधकाम विभागातील उपअभियंता श्रीराम बाबूराव बिरारे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यापोलिसांनी मंगळवारी रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुद्ध वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व आस्थापनांनी ‘वर्क फ्रॉम होम’ ही कार्यप्रणाली अवलंबिली आहे. अशा परिस्थितीतही उपअभियंता बिरारेला लाच घेण्याचा मोह आवरला नाही.

हर्सूल मध्यवर्ती कारागृहात सदरील ठेकेदाराने ७० टक्के काम पूर्ण केले आहे. शिवाय या ठेकेदाराने महिला कारागृहाचे नवीन बांधकाम केले असून, कारागृहातील मुलाखत खोलीच्या दुरुस्तीचे कामही केले आहे. या कामांचे बिल मंजूर करण्याचे अधिकार सा. बां. कार्यालयातील पश्चिम विभागाचे उपअभियंता श्रीराम बिरारे (५१, रा. मनीषा कॉलनी, जिल्हा न्यायालयामागे) याच्याकडे आहेत. प्रलंबित बिले मंजूर करण्यासाठी बिरारे याने ठेकेदाराकडे १ लाख २५ हजार रुपयांची मागणी केली. यापैकी बिरारे हा आज मंगळवारी १ लाख रुपये स्वीकारण्यास तयार झाला व उर्वरित २५ हजार रुपये बिले निघाल्यानंतर घेण्याचे ठरले. ही कारवाई यशस्वी करण्यासाठी पोलीस कर्मचारी विजय बाह्मंदे, संतोष जोशी, सुनील पाटील, विलास चव्हाण, चालक चांगदेव बागूल यांनी परिश्रम घेतले.ठेकेदाराला लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्याकडे केली. त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अनिता जमादार, पोलीस उपाधीक्षक बी. व्ही. गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उन्मेष थिटे व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी मंगळवारी बिरारेच्या निवासस्थानी सापळा रचला. त्यावेळी या ठेकेदाराने ठरल्यानुसार बिरारे यास पैसे देताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी बिरारे यास १ लाखाची लाच घेताना रंगेहाथ पकडले. 

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागPoliceपोलिसAurangabadऔरंगाबादArrestअटक