कोरोना हाहाकारामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला असल्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवा सुरू आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. त्यातच दिल्लीमध्ये क्षुल्लक वादातून हत्येचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजी न दिल्याने शेजाऱ्याने एका वृद्धाची हत्या केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू आहे.
दिल्ली येथील फ्लोअर मार्केट परिसरात एका वृद्ध व्यक्तीला लाठी - काठीने जबर मारहाण करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्धाच्या शेजारी राहणारा भाजी हिसकावून घेऊन जात होता. त्यातून दोघांमध्ये वादंग निर्माण झाला. या वादाचे पर्यवसन चक्क हत्येत झाले आहे.
दिल्लीतील संजय कॉलनी परिसरात राहणारे मनीष लॉकडाऊनमध्ये भाजी घेऊन परत आपल्या घरी येत होते. तेव्हा शेजारच्या रहिवासी असलेल्या नन्हे नावाच्या युवकाशी त्यांचा बातचीत सुरू झाली. यानंतर या युवकाने मनीष यांचा हातातील भाजी हिसवायला सुरवात केली. त्यामुळे या दोघांचं भांडण पाहून मनीषचे वृद्ध वडीलही तिथे पोहोचले.
मनीषच्या वडिलांनी भांडण सोडवण्यासाठी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपी नन्हे यांनी वृद्धाला लाठी - काठीने मारहाण करण्यास सुरवात केली. यानंतर हा वाद टोकाला पचला वृद्धावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात वयोवृद्ध गंभीर जखमी झाले आणि जमिनीवर पडले. इतके होऊन देखील संधी पाहून आरोपी भाज्या घेऊन पळून गेला. मनीष आपल्या वडिलांना हेडगेवार हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती पोहोचताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी नन्हेचा शोधही सुरू केला आहे.