शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

कुख्यात गुंड इकबाल मिर्चीच्या दोन साथीदारांना ईडीने केली अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 10:02 PM

२०० कोटी जमीन खरेदी प्रकरण; दिल्लीत कारवाई

ठळक मुद्दे मुंबईतील आणखी दोन मोठ्या बिल्डरांची नावे पुढे आली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दुपारी मुंबईतील न्यायालयात हजर केले असता ५ दिवसाची कोठडी मिळाली.

मुंबईमुंबईतील एका जमीन खरेदी घोटळ्याप्रकरणातील दिवगंत कुख्यात गुंड मोहम्मद इकबाल मेमन उर्फ इकबाल मिर्चीच्या दोघा फरारी साथीदारांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी दिल्लीत अटक केली. हारुण अलीम युसुफ व रणजितसिंग बिंद्रा अशी त्यांची नावे असून त्यांना पाच दिवसाची कोठडी मिळाली आहे. ३३ वर्षांपूर्वीच्या या घोटाळ्याप्रकरणी मुंबईतील आणखी दोन मोठ्या बिल्डरांची नावे पुढे आली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

इकबाल मिर्ची हा अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय होता.फरारी असताना त्याचे २०१३ मध्ये लंडनमध्ये निधन झाले आहे. त्याने मुंबईत वरळी व परिसरातील खरेदी केलेल्या भुखंड प्रकरणात २०० कोटीचा घोटाळा असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबई पोलिसांनी याबाबत दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर ईडीकडून याप्रकरणी मनी लॉण्डरिंग प्रतिबंधक कायद्यातर्गंत (पीएमएलए) गुन्हा दाखल करुन तपास करण्यात येत आहे.

दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय इकबाल मिर्चीने सप्टेंबर १९८६ मध्ये याने रॉकसाईड एंटरप्रायझेस कंपनीच्या मार्फत मोहम्मद युसुफ ट्रस्टच्या तीन मालमत्ता साडे सहा लाखांना विकत खरेदी केलेली होती. वरळी परिसरातील सी व्ह्यू, मरिअम लॉज आणि राबिया मॅन्शन या १५३७ चौरस मीटर लांबीच्या या मालमत्ता आहेत. परदेशात फरारी झालेल्या मिर्चीच्या या मिळकती मध्यस्थाच्यामार्फत विकण्यात आलेल्या असून त्याची किंमत २०० कोटीहून अधिक आहे. त्यामध्ये युसूफ व सन्बिक रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेडच्यावतीने रणजिंत सिंग बिंद्राने महत्वाची भूमिका पार पाडली होती.या व्यवहारातून त्यांनी ३० कोटीची दलाली मिळविल्याचे तपासातून स्पष्ट झाले. त्यामुळे या दोघांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजाविली होती. मात्र ते फरारी झाले होते, दिल्लीतील एका हॉटेलात थांबल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने त्यांना अटक करुन मुंबईत आणले. दुपारी मुंबईतील न्यायालयात हजर केले असता ५ दिवसाची कोठडी मिळाली. या व्यवहारात मुंबईतील काही बिल्डरांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले असून त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

 

टॅग्स :ArrestअटकEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयPoliceपोलिसMumbaiमुंबईNew Delhiनवी दिल्ली