लोकमत न्यूज नेटवर्क । मुंबई : तब्बल ३,९८३ कोटी रुपयांच्या येस बँक - डीएचएफएल घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले बिल्डर अविनाश भोसले आणि संजय छाब्रिया यांची एकूण ४१५ कोटींची मालमत्ता बुधवारी ईडीने जप्त केली. यापैकी छाब्रिया यांची २५१ कोटी रुपयांची, तर अविनाश भोसले यांची १६४ कोटी रुपयांची चल-अचल मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत ईडीने एकूण १,८२७ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.
राणा कपूर यांनी येस बँकेच्या माध्यमातून डीएचएफएल कंपनीला एकूण ३,९८३ कोटींचे कर्ज दिले होते. या कर्जापैकी बिल्डर छाब्रिया यांना सांताक्रूझ येथील ॲव्हेन्यू ५४ या प्रकल्पाकरिता डीएचएफएलने २,३१७ कोटींचे कर्ज दिले होते. मात्र, छाब्रिया यांनी कर्जापोटी मिळालेली रक्कम त्या प्रकल्पाकरिता न वापरता हे पैसे भोसले यांच्याशी संबंधित कंपन्यांमध्ये वळविले, तर या डीएचएफएलला ‘काही सेवा’ दिल्याप्रकरणी भोसले यांना ७१.८२ कोटी मिळाल्याचा ठपकाही ईडीने ठेवला आहे.
२५१ कोटींची जप्तीसंजय छाब्रिया n सांताक्रूझ येथील ११६ कोटी ५० लाख रुपये किमतीचा भूखंडn ११५ कोटी रुपयांच्या बंगळुरू येथील एका भूखंडातील छाब्रिया कंपनीची २५ टक्क्यांची हिस्सेदारीn सांताक्रूझ : ३ कोटीचा फ्लॅट. दिल्ली विमानतळावर छाब्रियांच्या मालकीच्या हॉटेलात १३.६७ कोटी रुपयांच्या नफ्याची रक्कम. ३.१० कोटी रुपये किमतीच्या तीन आलिशान गाड्या
१६४ कोटींची जप्तीअविनाश भोसले n मुंबईतील १०२ कोटी ८० लाख रुपये किमतीचा ड्युप्लेक्स फ्लॅटn पुण्यातील २९ कोटी २४ लाख रुपये किमतीचा भूखंडn पुण्यातील आणखी एक १४ कोटी ६५ लाख रुपये किमतीचा भूखंडn नागपूर येथील १५ कोटी ५२ लाख रुपये किमतीचा भूखंडn नागपूर येथील आणखी एक १ कोटी ४५ लाख किमतीचा भूखंड