मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याची मुख्य संशयित अभिनेत्री रिया चक्रवती हिचा अमलीपदार्थ सेवन व तस्करीत सहभाग असल्याचा संशय सक्तवसुली संचालनालयाला (ईडी ) आहे. तिच्या मोबाईल डाटा तपासणीतून त्यानुषंगाने काही माहिती मिळाली असून त्याच्या मुळापर्यत जाऊन तपास करण्यात येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
रियाकडून जप्त केलेल्या दोन मोबाईलपैकी एकामधील व्हाट्सअपचॅटमध्ये अमली पदार्थाबाबत अस्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे ड्रग्जचे सेवन व ती मागविण्यात तिचा कनेक्शन आहे का, या अनुषंगाने तपास केला जात आहे. त्याबाबत माहिती मिळविण्यासाठी अमली पदार्थ विरोधी पथकालाही कळविण्यात आले आहे.दरम्यान, ईडीने आतापर्यंत रिया आणि तिच्या कुटूंबियाकडे केलेल्या तपासातून कोणतीही गंभीर बाब समोर आलेली नाही. सुशांतच्या बँक खात्यावरून तिच्या तसेच तिच्या नातेवाईकाच्या खात्यावर कोणतेही आर्थिक व्यवहार झालेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ईडीने सुशांतचे वडील केके सिंह, बहिणी प्रियांका आणि मीतू, रिया आणि तिचे कुटुंबातील सदस्य, चित्रपट निर्माते रुमी जाफरी, सिद्धार्थ पिठानी, श्रुती मोदी, सॅम्युअल मिरांडा आणि इतरांची मनी लाँडरिंग एन्जेलची नोंद नोंदविली आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मोठी बातमी! महाड तालुक्यात पाच मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती
पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल
चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?