शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
3
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
4
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
5
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
6
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
7
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
8
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
9
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
10
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
11
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
12
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
13
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
14
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
15
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
16
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
17
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
18
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
19
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
20
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका

'ईडी'च्या संदीप सिंगला हवालाने हवे होते लाचेचे २० लाख; २० रुपयांच्या नोटेचा फोटोही घेतला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 6:52 AM

मुंबईतील ज्वेलरवर झालेल्या छापेमारीनंतर पुढील कारवाई टाळण्यासाठी सिंग याने संबंधित ज्वेलरकडे २० लाख रुपयांची लाच मागितली होती, सेवेतून केले निलंबित

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: ईडीचा सहायक संचालक संदीप सिंग यादव याने केलेल्या २० लाख रुपयांच्या लाचखोरीत नवी माहिती पुढे आली असून, सिंग याने लाचेची २० लाखांची रक्कम हवालाच्या माध्यमातून पाठविण्याची सूचना मुंबईस्थित ज्वेलरला केली होती. तसेच, याकरिता २० रुपयांच्या नोटेचा फोटो या व्यवहाराच्या शाश्वतीसाठीदेखील वापरला होता.

मुंबईतील ज्वेलरवर झालेल्या छापेमारीनंतर पुढील कारवाई टाळण्यासाठी सिंग याने संबंधित ज्वेलरकडे २० लाख रुपयांची लाच मागितली होती. मात्र, त्याने लाचेचे हे पैसे मुंबईत स्वीकरण्याऐवजी दिल्लीत स्वीकारले. एवढी मोठी रक्कम दिल्लीला पाठविण्यात अडचण असल्याचे सांगितल्यावर सिंग यानेच ज्वेलरला ही हवालामार्फत दिल्लीत पाठविण्याची सूचना केल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच हवालाच्या व्यवहारासाठी एखाद्या विशिष्ट चलनी नोटेचा फोटो वापरला जातो. पैसे पाठविणारा आणि स्वीकारणारा अशा दोघांकडेही एकाच क्रमांकाच्या चलनी नोटेचा फोटो असतो. दोन्ही बाजूचे फोटो जुळले की मगच ज्याला पैसे द्यायचे असतात ते दिले जातात. सिंग याने याचसोबत दिल्लीतील व्यवहारासाठी एक विशिष्ट मोबाइल क्रमांकदेखील संबंधित ज्वेलरला दिला होता. 

सेवेतून केले निलंबित

या सगळ्या घडामोडींनंतर प्रत्यक्ष व्यवहारावेळी संबंधित ज्वेलरने मुंबईतील सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्याच्या तक्रारीनंतर सीबीआयने सापळा रचत सिंग याला अटक केली आहे. सिंग याला सीबीआयने अटक केल्यानंतर गुरुवारी ईडीनेदेखील त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला सेवेतून निलंबित केले आहे.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय