शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

माजी DMK नेत्यावर ईडीची धाड; आलिशान बंगला, महागड्या कारसह ५५ कोटींची संपत्ती जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2024 11:04 AM

हे दोन्ही भाऊ अन्य साथीदार आणि नातेवाईकांसोबत अनेक फर्म, संस्था, कंपन्यांमध्ये भागीदार होते. याचा वापर गुन्ह्यातून मिळालेल्या पैशाचा वापर करण्यासाठी केला जात होता. 

नवी दिल्ली - माजी DMK नेत्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. तपास यंत्रणेने त्यांचा आलिशान बंगला, हॉटेल, महागड्या कारसह ५५ कोटींची संपत्ती जप्त केली आहे. डीएमकेचे माजी पदाधिकारी जाफर सादिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या संपत्तीवर ईडीने जप्ती केली. जप्त केलेल्या संपत्तीत रेसीडेंसी हॉटेल, आलिशान बंगला, जाग्वर, मर्सिडिजसारख्या ७ महागड्या कार यांचा समावेश आहे. बेकायदेशीररित्या ही संपत्ती जमा केल्याचा आरोप ईडीने लावला आहे.

ईडीने सादिक आणि त्यांचे सहकारी यांची ५५.३० कोटींची संपत्ती ताब्यात घेतली आहे. आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेट स्यूडोएफेड्राईन, केटामाइनच्या तस्करीच्या तपासानंतर ही कारवाई करण्यात आली. एनसीबी, कस्टम विभागाच्या  तपासाच्या आधारे ईडीने तामिळनाडूतील १५ ठिकाणी धाड टाकली. या संपत्तीचा मालक जाफर सादिक असल्याचं समोर आले. ईडीच्या तपासात जाफर सादिक त्याचा भाऊ मोहम्मद सलीम आणि अन्य लोकांसोबत मिळून स्यूडोएफेड्रीन आणि अन्य नशेचे पदार्थ निर्यात आणि तस्करी करण्यात सहभागी होते. 

ईडीनुसार, हे दोन्ही भाऊ अन्य साथीदार आणि नातेवाईकांसोबत अनेक फर्म, संस्था, कंपन्यांमध्ये भागीदार होते. याचा वापर गुन्ह्यातून मिळालेल्या पैशाचा वापर करण्यासाठी केला जात होता. ही संपूर्ण यंत्रणा बेकायदेशीरपणे ड्रग्स तस्करीच्या माध्यमातून मिळणारा पैसा वेगळ्या मार्गाने चलनात आणण्यासाठी केला जायचा. त्यासाठी जाफर सादिकला ईडीने २६ जून २०२४ ला अटक केली होती. त्यानंतर १२ ऑगस्टला त्याचा भाऊ मोहम्मद सलीमला ईडीने अटक केली. 

तस्करीतून कमावलेला काळा पैसा कुठे वापरला? ईडीच्या तपासात समोर आलंय की, जाफर सादिक आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ड्रग्सच्या व्यवसायातून बेकायदेशीर कमावलेला काळा पैसा रिअल इस्टेट, फिल्मनिर्मिती, हॉस्पिटॅलिटी आणि लॉजिस्टिक्ससह अनेक व्यवसायात गुंतवला होता. बँक खात्याच्या माध्यमातून एक नेटवर्क तयार करण्यात आले त्यात या पैशांचा वापर केला गेला. सादिक आणि त्याच्या कुटुंबाच्या खात्यातही पैसे पाठवले गेले. अवैधरित्या पैसे जमा केले असं तपासात उघड झाले.  

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय