शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

ईडीने ६७ पवनचक्क्या जप्त केल्या; ज्या कंपनीने बनविल्या त्यात घोटाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2022 11:04 AM

सुराणा समूहाच्या ३,९८६ कोटींचे बँक घोटाळा प्रकरण; ११३ कोटींची मालमत्ता जप्त

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुख्य कंपनीला कर्जापोटी मिळालेला पैसा बनावट कंपन्या स्थापन करून त्यांत वळविणे तसेच कर्जाची परतफेड न करता कर्ज थकविणे, या प्रकरणी सुराणा उद्योग समूहाला ईडीने दणका देत कंपनीची ११३ कोटी ३२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये ६७ पवनचक्क्यांचाही  समावेश आहे. या प्रकरणी कंपनीच्या संचालकांवर मनी लॉंड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

चेन्नईस्थित सुराणा समूहाने सरकारी बँकांचे ३,९८६ कोटी रुपयांचे कर्ज थकविल्याप्रकरणी सीबीआयने यापूर्वीच तीन एफआयआर दाखल करीत कंपनीच्या संचालकांना अटक केली आहे. या एफआयआरच्या आधारे ईडीने पुढील तपास सुरू केला आहे. उपलब्ध माहितीनुसार, कंपनीला बँकेकडून कर्ज प्राप्त झाल्यानंतर, कंपनीने काही बनावट कंपन्या स्थापन केल्या. यामध्ये आपले कर्मचारी, आपले नातेवाईक यांची संचालकपदी नेमणूक दाखवली. 

तसेच, या कंपन्यांसोबत केवळ कागदोपत्री खरेदी-विक्रीचा व्यवहार दाखविला. हे सारे करताना बनावट कंपन्यांत वळविलेले पैसे आणि कागदोपत्री व्यवहारातील पैसा, हे सारे पैसे कंपनीने संचालकाच्या वैयक्तिक वापरासाठी खर्च केले. या कर्जापोटी प्राप्त पैशांतून कंपनीने परदेशांतदेखील दोन ठिकाणी मालमत्तांची खरेदी केली. हे करताना बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड केली नाही. परिणामी बँकेचे कर्ज खाते थकीत झाले. या प्रकरणी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश सुराणा, विजय सुराणा आणि अन्य दोन बोगस संचालकांना अटक करण्यात आलेली आहे. 

स्वतःच्याच पवनचक्क्या पुन्हा घेतल्या विकतबँकेचे कर्ज थकल्याप्रकरणी यापूर्वी बँकेने कंपनीच्या ६७ पवनचक्क्यांची जप्ती केली होती. तसेच, कर्जापोटी दिलेल्या रकमेच्या वसुलीसाठी त्यांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली होती. मात्र, सुराणा समूहाने एका बेनामी कंपनीच्या माध्यमातून पुन्हा त्या पवनचक्क्यांची खरेदी केल्याचे ईडीच्या तपासात दिसून आले आहे.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय