शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
5
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
6
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
7
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
8
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
9
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
10
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
11
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
12
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
13
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
14
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
15
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
16
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
17
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
18
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
19
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
20
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना

लालूप्रसाद यादव, मुलगा तेजस्वी यादव यांना ईडीचे समन्स, काय आहे नक्की प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 17:26 IST

तेजस्वी यादवांना २२ तर लालू यांना २७ डिसेंबरला चौकशीसाठी समन्स

Lalu Prasad Yadav - Tejashwi Yadav, ED Summon ( Marathi News ) : गेल्या काही दिवसांपासून ईडी ही तपास यंत्रणा प्रचंड चर्चेत आहे. मनी लाँड्रिंग किंवा आर्थिक गैरव्यवहार या प्रकरणी ही यंत्रणा तपास करत असते. पण सत्ताधारी पक्ष या आणि इतर काही तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचे आरोप विरोधी पक्ष लावत आहेत. अशातच बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि त्यांचे पुत्र सध्याचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव या दोघांना ईडीने समन्स बजावले आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद यादव आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांना समन्स बजावले आहेत. ईडीने लालू यादव यांना 27 डिसेंबरला तर तेजस्वी यादव यांना 22 डिसेंबरला चौकशीसाठी बोलावले आहे.

कोणत्या प्रकरणात बजावले समन्स?

नोकरीच्या बदल्यात जमिनीच्या प्रकरणात लालू कुटुंबाच्या अडचणी वाढू शकतात. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव, माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांना नोकरीसाठी जमीन घोटाळ्यात आरोपी करण्यात आले आहे. ईडीच्या समन्सपूर्वी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात या प्रकरणी सुनावणी झाली. लालू प्रसाद यादव, राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांच्या अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने सीबीआयकडून उत्तर मागितले आहे. आरजेडी नेत्यांनी केलेल्या अर्जात आरोपपत्रासह दाखल केलेल्या कागदपत्रांचा पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली होती.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

18 मे 2022 रोजी सीबीआयने लालू प्रसाद यादव, माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि तेजस्वी यादव, मिसा भारती यांच्यासह 17 जणांविरुद्ध जमिनीच्या बदल्यात नोकऱ्या दिल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने नोंदवलेल्या एफआयआरमध्ये लालू प्रसाद यादव यांनी रेल्वेमंत्री असताना ड गटातील अनेक उमेदवारांना रेल्वेच्या विविध विभागांच्या पदांवर नियमबाह्य पद्धतीने नियुक्त केल्याचा आरोप आहे. 2004 ते 2009 दरम्यान झालेल्या या सर्व नियुक्त्यांमध्ये लालू यादव यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर जमीन घेतली होती असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवTejashwi Yadavतेजस्वी यादवEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयrailwayरेल्वे