प्रवर्तन निदेशालय (ED) ने चार वर्षे जुन्या ड्रग्ज प्रकरणात टॉलीवुडच्या टॉपचे अभिनेते, अभिनेत्री आणि डायरेक्टर्सना समन्स पाठविला आहे. यामध्ये रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh), राणा दग्गुबाती (Rana Daggubati), रवि तेजा (Ravi Teja), पुरी जगन्नाथ यांचा समावेश आहे. (ED summons Tollywood celebrities Rakul Preet, Rana Daggubati, Ravi Teja and Puri Jagannadh in drugs case)
सर्व अॅक्टर्सना तारखेसह नोटीस पाठविण्यात आली आहे. रकुल प्रीत सिंह 6 सप्टेंबर, राणा दग्गुबाती 8 सप्टेंबर, रवी तेजा 9 सप्टेंबर आणि पुरी जगन्नाथ 31 सप्टेंबर या तारखांना हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय चार्मी कौर, मुमैथ आणि अन्य लोकांनाही नोटीस पाठविण्यात आली आहे. चार वर्षांपूर्वीच्या या प्रकरणात आतापर्यंत 12 लोकांना नोटीस पाठविण्यात आली आहे.
अबकारी विभागाने जुलै 2017 मध्ये एका प्रसिद्ध बारवर छापा टाकला होता. या ठिकाणी झालेल्या झाडाझडतीनंतर वेगवेगळी 12 प्रकरणे समोर आली होती. या प्रकरणांवर 11 चार्जशीट दाखल करण्यात आल्या आहेत. रकुल प्रित सिंह दाक्षिणात्य सिनेमांसह बॉलिबुडच्या हिंदी सिनेमांतही झळकली आहे. तिने यारिया, अय्यारी, देदे प्यार दे, सरदार का ग्रँडसन या सिनेमांमध्ये काम केले आहे. तर बॉलिवुडमधील गाजलेला व्हिलन भल्लालदेवची भूमिका साकारणारा राणा दग्गुबाती देखील साऊथचा प्रसिद्ध चेहरा आहे. त्याने गाझी अॅटॅक, बेबी, दम मारो दम, हाथी मेरे साथी या बॉलिवुड सिनेमांमध्ये काम केले आहे.
रवी तेजा तेलगु सिनेमाचा प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने Nee Kosam, Itlu Sravani Subramanyam, Chiranjeevulu, Dubai Seenu, Krishna, Baladur, Neninthe, Kick सारखे प्रसिद्ध सिनेमे दिले आहेत. तर पुरी जगन्नाथ हा दिग्दर्शक धर्मा प्रॉडक्शनसोबतच्या लायगर फिल्ममुळे चर्चेत आहे. त्याने बुढ्ढा होगा तेरा बाप या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते.