शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
2
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
3
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
4
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
5
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
6
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
7
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
9
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित
10
"तुम्ही राजकारणाची पद्धत बदला!", शशांक केतकरची मतदानानंतरची पोस्ट चर्चेत
11
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
13
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल
14
"BCCI नाही, BJP सरकार...!"; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताच्या भूमिकेवर शोएब अख्तरचं मोठं विधान
15
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
16
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
17
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
19
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?

शिक्षण एमबीए, एमसीए कारनामे मात्र ‘फर्जी’; उच्चशिक्षितांच्या टोळीचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 5:39 AM

१,६०० सिम कार्ड्सचा वापर, सायबर शाखेने दिलेल्या माहितीनुसार, २४ डिसेंबर, २०२२ ते २ जानेवारी, २०२३ दरम्यान या टोळीने अनोळखी बँकेतून सौरभ शर्मा बोलत असल्याचे भासवून वेलिंग्टन क्लबच्या मोफत सदस्यत्वाबाबत सांगितले.  

मुंबई : हॅलो, मी बँकेतून बोलत आहे. तुम्ही सिटी बँक डायनर्स क्लबचे कार्ड घेतल्यास ताडदेवच्या वेलिंग्टन क्लबचे सदस्यत्व तुम्हाला मोफत मिळेल, अशा भूलथापा देऊन मुंबईसह राज्यातील हायप्रोफाइल मंडळींना टार्गेट करणाऱ्या उच्चशिक्षितांच्या टोळीचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी सायबर गुन्हे शाखेने पाच आरोपींना अटक केली असून, विशेष म्हणजे, पकडण्यात आलेले आरोपी एमबीए, एमसीए, मेकॅनिकल इंजिनीअर वगैरे शिक्षण घेतलेले आहेत. या गुन्ह्यात फसवणुकीसाठी तब्बल १,६०० सिम कार्ड्सचा वापर करण्यात आला आहे. 

सायबर पोलिसांनी,  जॉन राज  (३५, हॉटेल मॅनेजमेंट), नंदकुमार एम. चंद्रशेखर (४२, एमसीए),  पवथराणी रम्की पार्थसारथी एस.एल. (३३ एमबीए),  अय्यप्पन मुरुगसेन (३५, मेकॅनिकल इंजिनीअर), प्रेमसागर रामस्वरूप (२३, दहावी, उत्तर प्रदेश) या आरोपीना अटक केली आहे, तर या टोळीचा मास्टरमाइंड गुजरातचा आशिष रवींद्र नाथन याचा शोध सुरू आहे. आरोपींनी १६ गुन्ह्यांतून सव्वाकोटींची फसवणूक केले आहे. आरोपी मुंबई व नवी मुंबईतील नवीन बी.एम.डब्लू, मर्सिडिज कार खरेदी करणाऱ्याची माहिती मिळवून क्लबची जाहिरात व्हॉट्सॲपद्वारे पाठवून संपर्क करायचे.

सायबर शाखेने दिलेल्या माहितीनुसार, २४ डिसेंबर, २०२२ ते २ जानेवारी, २०२३ दरम्यान या टोळीने अनोळखी बँकेतून सौरभ शर्मा बोलत असल्याचे भासवून वेलिंग्टन क्लबच्या मोफत सदस्यत्वाबाबत सांगितले.  बनावट माहितीपत्रके पाठवून विश्वास संपादन केला. तक्रारदार जाळ्यात येताच, दोन लिंक पाठवून त्यांच्या खात्यातील पावणेदहा लाखांच्या रकमेवर डल्ला मारला. पोलिस तपासात सिटी बँक डायर्नस क्बलच्या नावाने मुंबई व नवी मुंबई परिसरात ३२ पेक्षा अधिक गुन्हे असल्याचे दिसून आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ.बालसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिस ठाण्याचे प्र.पो.नि. सुवर्णा शिंदे यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासात  तामिळनाडू, दिल्ली, उत्तर प्रदेश, गुजरात महाराष्ट्र  या राज्यांतून हे रॅकेट ऑपरेट होत असल्याचे तांत्रिक तपासातून समोर आला. त्यानुसार कारवाई करून वरील पाच जणांना अटक करण्यात आली. 

क्रेडिट कार्डच्या नावानेही फसवणूक यातील मुख्य सूत्रधार आशिष आणि अटक आरोपी अय्यप्पन मुरुगसेन यांनी अशाच प्रकारे यापूर्वी एका नामांकित कंपनीच्या क्रेडिट कार्डच्या नावाने फसवणूक केल्याचे समोर आले. आशिषच्या दिल्लीतील घरातून महत्त्वाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्या आधारे अधिक तपास सुरू आहे. आशिषने आयआयटीतून अर्धवट शिक्षण घेतले आहे.  

टॅग्स :fraudधोकेबाजी