शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

Eknath Khadse: 'कुछ तो होने वाला है'! मेसेज जळगावात फिरतायत; एकनाथ खडसेंचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2021 11:20 AM

Eknath Khadse At ED office: फडणवीस सरकारमध्ये खडसे हे महसूलमंत्री असताना भोसरी येथे ३.१ एकर भूखंड खडसे यांची पत्नी व जावयाच्या नावे खरेदी करण्यात आला होता. ३१ कोटी किंमतीच्या या भूखंडाची निव्वळ ३.७ कोटींना विक्री झाल्याचा दावा केला गेला.  

Eknath Khadse At ED office:  एकनाथ खडसेंची (eknath khadse) प्रकृती खालावल्यामुळे त्यांची आज होणारी पत्रकार परिषद रद्द केल्याची माहिती देण्यात आली होती. त्यामुळे एकनाथ खडसे आज चौकशीसाठी ईडी कार्यालयात (ED office) उपस्थित राहणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित केले जात होते. मात्र, खडसे यांनीच प्रसारमाध्यमांसमोर येत ईडीच्या ऑफिसमध्ये जात असल्याचे सांगितले. आता खडसे ईडीच्या ऑफिसमध्ये पोहोचले आहेत. (Eknath Khadase came at ED office after illness claim.)

प्रकृती खालावलेली असतानाही एकनाथ खडसे ईडीच्या चौकशीसाठी हजर

ईडीने खडसेंचे जावई गिरीश चौधरी (Girish chaudhary) यांना अटक केली. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) माजी महसूलमंत्री व राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केली आहे. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात मंगळवारी सुमारे १३ तास चौकशी केल्यानंतर अटक करण्यात आली. ईडी न्यायालयाने त्यांना १२ जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे. यानंतर एकनाथ खडसेंना चौकशीसाठी समन्स पाठविले होते. 

यावर खडसेंनी ही राजकीय हेतूने प्रेरित कारवाई असल्याचा आरोप केला. तसेच आपण ईडीला सहकार्य करणार असून त्यांना हवी असलेली माहिती मी देणार आहे. परंतू मला यात राजकीय वास येत आहे. माझ्या माहितीप्रमाणे हा भूखंड खासगी आहे. एमआयडीसीने सांगावे की तो भूखंड आपला आहे, जमीन मालकाला मोबदला दिला आहे, असे सांगितल्यास मी दोषीच असेन. कुछ तो होने वाला है, असे मेसेज जळगावात फिरत आहेत. पातच वर्षांपूर्वीचे प्रकरण पुन्हा काढले, मला अडकविण्याच प्रयत्न असल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे. 

मी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर माझी चौकशी सुरु झाली. हे कार्यकर्त्यांनाही माहिती आहे. यामुळे यात राजकीय हेतू असल्याचे खडसे म्हणाले. 

फडणवीस सरकारमध्ये खडसे हे महसूलमंत्री असताना भोसरी येथे ३.१ एकर भूखंड खडसे यांची पत्नी व जावयाच्या नावे खरेदी करण्यात आला होता. ३१ कोटी किंमतीच्या या भूखंडाची निव्वळ ३.७ कोटींना विक्री झाल्याचा दावा केला गेला.  हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून एमआयडीसीने १९७१ मध्ये अधिग्रहण केला होता, परंतु उकानी यांना नुकसानभरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे.  

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयNCPराष्ट्रवादी काँग्रेस